“जनतेच्या शक्तीनं भांडवलशाही शक्तींचा पराभव केला,” कर्नाटकातील निकालांवर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 03:11 PM2023-05-13T15:11:56+5:302023-05-13T15:12:33+5:30

आम्ही द्वेषानं, चुकीच्या शब्दांचा वापर करून ही लढाई लढलो नाही, राहुल गांधींचं वक्तव्य.

karnataka election result 2023 congress rahul gandhi targets bjp after winning assembly elections | “जनतेच्या शक्तीनं भांडवलशाही शक्तींचा पराभव केला,” कर्नाटकातील निकालांवर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

“जनतेच्या शक्तीनं भांडवलशाही शक्तींचा पराभव केला,” कर्नाटकातील निकालांवर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

googlenewsNext

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. काँग्रेसनं बहुमताचा जादुई आकडादेखील गाठला आहे. दुसरीकडे भाजपचा दक्षिणेचा बालेकिल्ला ढासळल्याचं चित्र निर्माण झालं आहे. यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली. तसंच त्यांनी कर्नाटकातील जनतेचे आणि तेथील कार्यकर्ते, नेत्यांचे आभारही मानले.

“कर्नाटक निवडणुकीत एकीकडे भांडवलदारांची ताकद होती. तर दुसरीकडे गरीब जनतेची ताकद होती. जनतेच्या शक्तीनं ताकदीचा पराभव केला. हेच आता प्रत्येक राज्यात होईल. काँग्रेस कर्नाटकात गरीबांसोबत उभी राहिली. आम्ही गरीबांच्या मुद्द्यावर लढलो. आम्ही द्वेषानं, चुकीच्या शब्दांचा वापर करून ही लढाई लढलो नाही,” असं राहुल गांधी म्हणाले.

“आम्ही प्रेमानं ही लढाई लढलो. हा देशाला प्रेमच आवडतं हे कर्नाटकानं दाखवून दिलं. कर्नाटकात आता द्वेषाचा बाजार बंद झालाय आणि प्रेमाची दुकानं खुली झाली आहेत. हा सर्वांचा विजय आहे. सर्वप्रथम हा कर्नाटकातील जनतेचा विजय आहे. आम्ही कर्नाटकातील जनतेला ५ आश्वासनं दिली होती. आम्ही ती पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत पूर्ण करू” असंही त्यांनी स्पष्ट केल.

राहुल गांधींच्या १८ रॅली आणि रोड शो

कर्नाटकात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची भूमिका महत्त्वाची आहे, तसंच राहुल गांधी यांचादेखील मोठा हात आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान ते २१ दिवस कर्नाटकात होते आणि ५०० किमी पेक्षा अधिक प्रवास पायी केला. निवडणुकीसाठीही त्यांनी १८ रॅली आणि रोड शो केले. याशिवाय मल्लिकार्जून खर्गेंनी ३५ रॅली, १ रोड शो आणि प्रियंका गांधींनी १४ रॅली आणि ११ रोड शो, सोनिया गांधींनीदेखील १ रॅली केली होती.

Web Title: karnataka election result 2023 congress rahul gandhi targets bjp after winning assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.