Karnataka Assembly Elections 2018 : कर्नाटक निवडणुकीचे रण पेटले! दलितांच्या प्रश्नावरून मोदी-राहुल गांधी आमनेसामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 02:13 AM2018-05-07T02:13:06+5:302018-05-07T02:13:06+5:30
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे रण पेटले असून, प्रचाराला नवी धार आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलित कार्ड बाहेर काढून काँग्रेसवर टीका केली तर राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरवर व्हिडीओ टाकून भाजपाचे दलितांबद्दल प्रेम कसे बेगडी आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे रण पेटले असून, प्रचाराला नवी धार आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलित कार्ड बाहेर काढून काँग्रेसवर टीका केली तर राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरवर व्हिडीओ टाकून भाजपाचे दलितांबद्दल प्रेम कसे बेगडी आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही मोदींवर पटलवार करत, प्रचाराची ही भाषा पंतप्रधानपदावर असलेल्या नेत्याला शोभत नसल्याचा चिमटा काढला.
मतांसाठी काँग्रेस साजरी करते सुलतानांच्या जयंत्या
चित्रदुर्ग (कर्नाटक): काँग्रेस फक्त मतपेट्यांच्या राजकारणासाठीच सुलतानांच्या जयंत्या साजऱ्या करीत आहेत, असा हल्ला करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजात फूट पाडण्यासाठी काँग्रेस पक्ष इतिहासाला विपरीत रूप देत आहे, असा आरोप केला. मोदी म्हणाले की, मतपेट्यांच्या राजकारणापायी वीरा मदकारी आणि ओनाके ओबाव्वा यांचा विसर पडला. परंतु, सुलतानांच्या जयंत्या मात्र साजºया केल्या जात आहेत. सिद्धरामय्या यांनी टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्यास सुरुवात केली होती.
मोदींची टीका खालच्या पातळीची
बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी खालच्या पातळीवर जाऊन तसेच वैयक्तिक टीका करीत आहेत, असा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रविवारी केला. पंतप्रधानपदी बसलेल्या माणसाच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. ते सभ्य भाषेत बोलतील अशी आमची अपेक्षा होती. कोणताही सुसंस्कृत माणूस, अशा भाषेत बोलणार नाही, असा टोलाही सिद्धरामय्या यांनी लगावला.
केंद्र सरकारच्या कामगिरीबद्दल मोदी जनतेला काही सांगतील, कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या कारभारावर टीका करतील, अशी अपेक्षा होती. पण मोदी वैयक्तिक टीका करून क्षुद्र मनोवृत्तीचे दर्शन घडवत आहेत. माझ्याविरोधात काही पुरावे असतील तर त्यांनी जनतेसमोर मांडावेत.
दलितांनी तळातच राहावे ही भाजपाची इच्छा - राहुल गांधी
नवी दिल्ली : भाजपा-संघाच्या दलितविरोधी भूमिकेवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी व्हिडीओच्या माध्यमातून प्रहार केला. दलितांनी कायम तळागाळातच राहावे अशीच या फॅसिस्ट विचारांच्या संघटनांची इच्छा आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. भाजपा व संघाच्या नेत्यांनी जी दलितविरोधी विधाने केली आहेत त्याचा समाचार व्हिडीओत आला आहे. देशात दलितांवर होणाºया अत्याचारांचे प्रमाण वाढले असून त्याविषयी मोदी चकार शब्द काढत नाहीत याबद्दलही राहुल यांनी टीका केली.
समाजमाध्यमांवर असेच सक्रिय राहा - शशी थरूर
राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरद्वारे लोकांशी असाच संपर्क ठेवावा, असे आवाहन शशी थरूर यांनी केले.
कर्नाटकात प्रचारासाठी सोनिया गांधी जाणार
तब्येतीच्या कारणामुळे प्रचारापासून दूर राहणाºया सोनिया गांधी कर्नाटकात प्रचारासाठी उतरणार आहेत.