Kerala Assembly Election 2021: राहुल गांधी फक्त मुलींच्या कॉलेजलाच भेट देतात; माजी खासदाराचे वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 01:21 PM2021-03-30T13:21:09+5:302021-03-30T13:22:53+5:30
kerala assembly election 2021: केरळमधील माजी खासदार जॉयस जॉर्ज यांनी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (rahul gandhi) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे.
इडुक्की: केरळ विधानसभा निवडणुकीची (kerala assembly election 2021) रणधुमाळी शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. प्रचारसभांना संबोधित करताना अनेक नेत्यांची जीभ घसरत असल्याचेही दिसून येत आहे. भाजप नेते दिलीप घोष यांनी ममता बॅनर्जी यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता केरळमधील माजी खासदार जॉयस जॉर्ज यांनी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (rahul gandhi) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. राहुल गांधींपासून मुलींनी संभाळून रहावे, त्यांचे अजून लग्न झालेले नाही, असे जॉर्ज यांनी म्हटले आहे. (ex kerala mp joyce george claims that congress rahul gandhi visit only women college)
सीपीआयचे (एम) उमेदवार आणि नेते एम. एम. मणी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये जॉर्ज यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेनंतर काँग्रेस आक्रमक झाला असून, जॉर्ज यांनी मर्यादा ओलांडल्याची टीका केली जात आहे. लेफ्ट डेमोक्रेटीक फ्रंटच्या पाठिंबाव्यावर जॉर्ज अपक्ष खासदार म्हणून निवडून आले होते.
“POK वर ताबा मिळवणे आणि बलुचिस्तान स्वतंत्र्य करणे, हे आता विसरून जा”
काय म्हणाले जॉयस जॉर्ज
मुलींनी राहुल गांधी यांच्यापासून संभाळून रहावे, कारण त्यांचे अजूनही लग्न झालेले नाही. राहुल गांधी यांच्या दौऱ्याचे आयोजन अशापद्धतीने करण्यात आले आहे की, ते केवळ विद्यार्थीनी असणाऱ्या कॉलेजेला भेट देतात. तिथे ते मुलींना वाकण्यासंदर्भात शिकवण देतात. सर्व विद्यार्थिनींना विनंती आहे की, त्यांनी राहुल गांधीसमोर वाकून उभे राहू नये, असे धक्कादायक विधान जॉर्ज यांनी केले.
We condemn this misogynistic comment by Joyce George.
— Congress Kerala (@INCKerala) March 30, 2021
It’s clear @cpimspeak is feeling the heat of losing elections https://t.co/IZWlV4j0xQ
केरळ काँग्रेसकडून निषेध
केरळचे माजी खासदार जॉयस जॉर्ज यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. केरळ काँग्रेसने जॉर्ज यांच्या वक्तव्याचा निषेध करत केला आहे. सीपीआयला पराभव दिसू लागल्याने राहुल यांच्याबद्दल अशी वक्तव्य केली जात असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात काँग्रेसकडून एक ट्विटही करण्यात आले आहे.
२०० जागा विसरा, भाजपला मोठा रसगुल्ला मिळेल; ममता दीदींचा अमित शाहांना टोला
दरम्यान, राहुल गांधी यांनी अलीकडेच संत टेरेसा कॉलेजमधील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला होता. केरळमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेक नेते प्रचारसभांना संबोधित करत आहेत.