Kerala Exit Poll 2021: केरळमध्ये ४० वर्षांचा रेकॉर्ड मोडणार; पिनरायी विजयन सत्ता राखणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 08:44 PM2021-04-29T20:44:17+5:302021-04-29T20:46:41+5:30

Kerala Exit Poll 2021: केरळमध्ये ४० वर्षांचा रेकॉर्ड मोडला जाण्याची शक्यता असून, LDF ला सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

kerala exit poll results 2021 who will win ldf or udf or left congress bjp | Kerala Exit Poll 2021: केरळमध्ये ४० वर्षांचा रेकॉर्ड मोडणार; पिनरायी विजयन सत्ता राखणार!

Kerala Exit Poll 2021: केरळमध्ये ४० वर्षांचा रेकॉर्ड मोडणार; पिनरायी विजयन सत्ता राखणार!

Next
ठळक मुद्देकेरळ विधानसभा निवडणुकांचा एक्झिट पोलLDF सत्ता टिकवतील, असा अंदाजकेरळमध्ये ४० वर्षांचे इतिहास बदलणार असल्याचे संकेत

नवी दिल्ली: देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी गुरुवारी सायंकाळी संपली. पश्चिम बंगालमध्ये आठव्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पार पडले. यानंतर पाचही राज्यातील निवडणूकपूर्व अंदाज घोषित केले जात आहेत. केरळमधील निवडणुकांचेही एक्झिट पोल यायला सुरुवात झाली आहे. एक्सिस माय इंडिया यांनी वर्तवलेल्या एक्झिट पोलनुसार, ४० वर्षांचा रेकॉर्ड मोडला जाण्याची शक्यता असून, LDF ला सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (kerala exit poll results 2021 who will win ldf or udf or left congress bjp)

पाच राज्यांपैकी केरळ विधानसभा निवडणुकांसाठी ६ एप्रिल रोजी मतदान झाले. केरळ विधानसभेच्या १४० जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. आजतक एक्सिस माय इंडियाने केलेल्या एक्झिट पोलनुसार लेफ्ट डेमोक्रेटिक पक्ष (LDF) पुन्हा बाजी मारेल. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रेटिक पक्षाला (UDF) काही प्रमाणात यश मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. तर केंद्रासह अनेक राज्यात सत्ता असलेल्या भाजपच्या पदरात पुन्हा एकदा निराशा पडेल, असे म्हटले जात आहे. 

राज्यात १५ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची गरज; मुंबई हायकोर्टाची सरकारला सूचना

कोणाला किती जागा मिळणार?

एक्झिट पोलनुसार LDF ला १४० जागांपैकी १०४ ते १२० जागांवर विजय मिळेल, असे सांगितले जात आहे. तर UDF ला २० ते ३६ जागा, तर NDA आणि इतर ० ते २ जागा जिंकू शकतील, असे सांगितले जात आहे. केरळमधील एकूण मतांपैकी LDF ला ४७ टक्के मते मिळतील, तर UDF ला ३८ टक्के मते मिळतील, तसेच NDA ला १२ टक्के मते मिळतील, असे सांगितले जात आहे. अन्य उमेदवारांना ३ टक्के मते मिळतील. तर, सीव्होटरच्या एक्झिट पोलनुसार, LDF ला ७१ ते ७७ जागा, UDF ला ६२ ते ६८ जागा, तर NDA ला २ जागांवर विजय मिळू शकेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. 

४० वर्षांचा रेकॉर्ड तुटणार?

सन १९८० नंतर एकदा सत्ता स्थापन केलेल्या पक्षाला किंवा युतीच्या सरकारला पुन्हा जनतेने संधी दिलेली नाही. प्रत्येक पाच वर्षानंतर केरळमध्ये सत्ता परिवर्तन होते, असा आतापर्यंतचा इतिहास आहे. केरळमध्ये LDF आणि UDF यांच्यात कडवी टक्कर असणार आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत गेल्या ४० वर्षांचा इतिहास बदलून LDF पुन्हा सत्तेत येऊ शकतं, असा अंदाज वर्तवला आहे. 

रुग्णालयांचा पुरवठा कमी करा, घरी उपचार घेणाऱ्यांना ऑक्सिजन द्या: दिल्ली हायकोर्ट

दरम्यान, देशभरात आसाम, पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि केरळ या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या. तसेच काही ठिकाणी पोटनिवडणुकाही घेण्यात आल्या. या सर्वांची मतमोजणी २ मे रोजी होणार असून, मतदारांनी नेमका कौल कुणाला दिला आहे, हे स्पष्ट होईल.

Web Title: kerala exit poll results 2021 who will win ldf or udf or left congress bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.