Kiren Rijiju Rahul Gandhi : 'देशातील नागरिकांना माहितीये, राहुल गांधी पप्पू आहेत, पण...' केंद्रीय मंत्र्यांची जहरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 02:01 PM2023-03-09T14:01:27+5:302023-03-09T14:02:17+5:30
'काँग्रेसचे स्वयंघोषित राजकुमार देशाच्या एकतेसाठी धोकादायक आहेत.'- किरेन रिजिजू
Kiren Rijiju On Rahul Gandhi:काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) ब्रिटनमधून देशातील परिस्थिती आणि केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका करत आहेत. यावरुन देशातील राजकारण तापले असून, भाजप नेतेही राहुल गांधीवर टीका करताना दिसत आहे. यातच आता 'राहुल गांधी देशाच्या एकतेसाठी अत्यंत धोकादायक आहेत', अशी जहरी टीका केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी केली आहे.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट करत म्हटले की, 'काँग्रेसच्या स्वयंघोषित राजकुमाराने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आता तो लोकांना भारताचे तुकडे करण्यासाठी चिथावणी देत आहे. राहुल गांधी पप्पू आहेत, हे भारतीयांना माहित आहेप, पण परदेशी लोकांना माहित नाही. त्यांच्या मूर्खपाच्या विधानांना उत्तर देण्याची गरज नाही, परंतु खरी समस्या ही आहे की, त्यांच्या भारतविरोधी विधानांचा वापर देशविरोधी शक्ती भारताची प्रतिमा डागाळण्यासाठी करत आहेत.'
People of India know Rahul Gandhi is Pappu but foreigners don't know that he is actually Pappu.
— Kiren Rijiju (@KirenRijiju) March 8, 2023
And it's not necessary to react to his Foolish Statements but the problem is that his Anti-India statements are misused by the Anti-India Forces to tarnish the image of India.
राहुलचा व्हिडिओ शेअर केला
रिजिजू यांनी राहुल गांधींच्या केंब्रिजमधील संबोधनाचा व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये राहुल गांधी म्हणाले की, 'पीएम मोदी भारताचा नाश करत आहेत. शीख, मुस्लिम आणि ख्रिश्चन सर्वच लोक भारतात राहतात. सर्व भारताचे नागरिक आहेत, पण नरेंद्र मोदींचा तसा विश्वास नाही. ते त्यांना भारतातील द्वितीय श्रेणीचे नागरिक मानतात.'
आधीही केली टीका
रिजिजू यांनी राहुल गांधींच्या त्या टीकेवरही पलटवार केला होता, ज्यात राहुल गांधींनी म्हटले होते की, त्यांना भारतात बोलू दिले जात नाही. रिजिजू म्हणाले, 'राहुल गांधी असोत किंवा इतर कोणीही...हे लोक सकाळपासून रात्रीपर्यंत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव्या देत असतात आणि म्हणतात की, त्यांना बोलू दिले जात नाही.'