काँग्रेस पक्ष नेतृत्वाबद्दल प्रश्न विचारणारे नेते एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 04:42 AM2020-12-16T04:42:36+5:302020-12-16T04:42:58+5:30
सोनिया गांधींना भेटण्याची इच्छा; राहुल गांधी व गटाचे नेतृत्व स्वीकारण्याची तयारी नाही
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे नेतृत्व आणि त्याच्या कार्यशैलीबद्दल प्रश्न उपस्थित करणारे पक्षाचे वरिष्ठ नेते पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. उच्चपदस्थ सूत्रांनुसार हे नेते पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेण्याचा विचार करत आहेत म्हणजे त्यांना पक्षात सध्या जे काही सुरू आहे त्याबद्दल माहिती देता येईल.
ही नेते मंडळी राहुल गांधी आणि त्यांच्या अवतीभवती असलेल्यांचे नेतृत्व स्वीकारण्यास तयार नाहीत. सोनिया गांधी यांनी पक्षात सामूहिक नेतृत्वाकडे पक्ष चालवण्याची जबाबदारी सोपवावी किंवा पक्षाच्या कोणा वरिष्ठ नेत्याकडे (मग ते राहुल गांधी असले तरी चालतील) अध्यक्षपद सोपवून एक समूह स्थापन करावा म्हणजे तो पक्ष चालवेल.
ग्रुप २३ मधील एका नेत्याने अनौपचारिक चर्चेत मान्य केले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुढे जाण्याची शक्यता दिसत नाही. कारण ते ना वरिष्ठ नेत्याचा सल्ला घेतात, ना त्यांच्याशी चर्चा करतात. गांधी यांच्याभोवती जे लोक आहेत त्यांच्याकडे राजकीय अनुभव नाही. पक्षनेत्यांना हे हवे की, राहुल गांधी यांनी पक्षाचे नेतृत्व करावे. परंतु, पक्षाचा सतत निवडणुकीत होत असलेला पराभव, कार्यकर्त्यांमध्ये आलेली निराशा हे सांगते की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाशी कार्यकर्ता थेट संवाद होत नसल्यामुळे दु:खी आहे.
काही दिवसांपूर्वी कार्यकारिणी समितीच्या बैठकीत २३ नेत्यांनी लिहिलेल्या पत्रावर चर्चा झाली होती. त्यात संकेत दिले गेले होते की, नेतृत्व आपल्या कार्यशैलीत सुधार करील. परंतु, अजून समाधानकारक परिणाम दिसलेले नाहीत. पक्षात निवडणूक घेण्याचा मुद्दाही पुढे सरकलेली नाही. या नेत्याचे म्हणणे होते की, कार्यकारिणी समितीची विधिवत निवडणूक व्हावी म्हणजे तळागाळात मुळे असलेले नेते पक्षाला दिशा देऊ शकतील. या नेत्याने खुलासा केला की, ग्रुप २३ आता नेत्यांचा गट नाही. त्यात मोठ्या संख्येने विभिन्न प्रांतांतील नेते जोडले गेले आहेत. सोनिया गांधी यांना हा गट आपल्या भावना कळवाव्यात असा विचार करत आहे. पक्ष गंभीर संकटातून जात आहे हे खरे. परंतु, त्यातून बाहेर पडण्याची जबाबदारीही नेत्यांसह पक्ष नेतृत्वाचीही आहे.
कार्यशैलीत सुधारणा नाही
काही दिवसांपूर्वी कार्यकारिणी समितीच्या बैठकीत २३ नेत्यांनी लिहिलेल्या पत्रावर चर्चा झाली होती. त्यात संकेत दिले गेले होते की, नेतृत्व आपल्या कार्यशैलीत सुधार करील. परंतु, अजून समाधानकारक परिणाम दिसलेले नाहीत. या नेत्याचे म्हणणे होते की, कार्यकारिणी समितीची विधिवत निवडणूक व्हावी म्हणजे तळागाळात मुळे असलेले नेते पक्षाला दिशा देऊ शकतील.