LIC ची पुन्हा अदानी समूहात मोठी गुंतवणूक; काँग्रेस नेते म्हणाले- आमची JPC ची मागणी योग्च...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 02:45 PM2023-04-12T14:45:09+5:302023-04-12T14:45:48+5:30
LIC Adani : अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होऊनही LIC ने अदानी समूहातील आपली गुंतवणूक वाढवली आहे.
LIC Adani : अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होऊनही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ने अदानी समूहातील आपली हिस्सेदारी वाढवली आहे. यावरुन पुन्हा एकदा काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एका निवेदनात आरोप केला की, एलआयसीला अदानीचे शेअर्स खरेदी करण्यास भाग पाडले जात आहे. यासोबतच त्यांनी पुन्हा एकदा अदानींवर लावण्यात आलेल्या आरोपांची जेपीसी चौकशीची मागणी केली आहे.
ट्विटद्वारे जेपीसीची मागणी
जयराम रमेश यांनी ट्विटद्वारे म्हटले की, अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये झपाट्याने घसरण होत असूनही एलआयसीने त्यांचे लाखो शेअर्स खरेदी केले आहेत. या खुलाशामुळे पंतप्रधानांशी संबंधित अदानी घोटाळ्यात जेपीसी (संयुक्त संसदीय समिती) स्थापन करण्याच्या मागणीला आणखी बळ मिळाले आहे. पंतप्रधानांच्या आवडत्या उद्योग समूहाला बुडण्यापासून वाचवण्यासाठी एलआयसीला पॉलिसीधारकांचे पैसे वापरण्यास भाग पाडले जात आहे, हे यावरून स्पष्ट होते, असे जयराम रमेश म्हणाले.
अडानी एंटरप्राइजेज के स्टॉक वैल्यू तेज़ी से गिरने के बावजूद LIC ने उसके लाखों शेयर ख़रीदे। यह खुलासा PM से जुड़े अडानी महाघोटाले में JPC (संयुक्त संसदीय समिति) की मांग को और मजबूत करता है।
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) April 11, 2023
इस मामले पर मेरा बयान। pic.twitter.com/iWPiVGTx3J
24 जानेवारीनंतर सतत खुलासे
काँग्रेस सरचिटणीसांनी पुढे लिहिले की, 24 जानेवारी 2023 रोजी अदानी समूहाबाबतच्या हिंडेनबर्ग अहवालात प्रश्न उपस्थित करण्यात आल्यापासून रोज नवनवीन खुलासे होत आहेत. जून 2021 मध्ये अदानी एंटरप्रायझेसमध्ये LIC ची हिस्सेदारी फक्त 1.32 टक्के होती, जी डिसेंबर 2022 अखेरीस 4.32 टक्क्यांपर्यंत वाढली. दरम्यान, एलआयसीने अलीकडेच अदानीच्या चार कंपन्यांमध्ये आपला हिस्सा वाढवला आहे. त्यानंतर विमा कंपनीची अदानी एंटरप्रायझेसमधील भागीदारी 4.26 टक्क्यांवर गेली आहे. एलआयसीने जानेवारी-मार्च 2023 या तिमाहीत समूहाच्या या प्रमुख कंपनीचे 3.75 लाख शेअर्स खरेदी केले आहेत.
वाचा संबंधित बातमी- या वर्षी LIC चे सर्वात मोठे धाडस; दररोज खरेदी केले अडानी समूहाचे 3900 शेअर...