मोदी हे फक्त खोटा प्रचार करतात : पी चिदंबरम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 04:14 PM2019-05-15T16:14:43+5:302019-05-15T16:17:08+5:30
भारतात पहिल्यांदाच आम्ही सर्जिकल स्ट्राइक केले असे मोदी म्हणतात. प्रत्यक्षात मात्र, आमच्या काळात ही सर्जिकल स्ट्राइक झाले आणि ते कधी करण्यात आले त्याची तारीख आणि वेळ नुकतेच आम्ही देशासमोर आणले.
मुंबई - देशात पुन्हा भाजप सरकार येणार नाही. सरकार विरोधात असलेल्या पक्षाचे बहुमतापेक्षा जास्त खासदार निवडून येतील असा दावा माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनी केला आहे. पाच वर्षात एनडीए सरकारचे काम अपेक्षाभंग करणारे आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्वाचे मुद्दे आपल्या भाषणात बोलत नाही. शेतकरी कर्ज माफी, आर्थिक प्रगती, देशातील रोजगार, यावर मोदी बोलत नाही. मोदी हे फक्त खोटा प्रचार करतात असा टोला पी चिदंबरम यांनी मोदींना लगावला. चिदंबरम हे एका मुलाखतीत बोलत होते.
भारतात पहिल्यांदाच आम्ही सर्जिकल स्ट्राइक केले असे मोदी म्हणतात. प्रत्यक्षात मात्र, आमच्या काळात ही सर्जिकल स्ट्राइक झाले आणि ते कधी करण्यात आले त्याची तारीख आणि वेळ नुकतेच आम्ही देशासमोर आणले. मोदींचे मंत्रालय खोट बोलत आहे की, कॉंग्रेसच्या काळात सर्जिकल स्ट्राइक झालेच नाही. ते खोटे बोलत असले, तरीही सैनिक कधीच खोट बोलत नाहीत. याआधी, सुद्धा सर्जिकल स्ट्राइक झाले असल्याचे, सेनाध्यक्ष जनरल विक्रम सिंह यांनी स्पष्ट केले आहे. असे म्हणत चिदंबरम यांनी भाजप खोटे बोलत असल्याचा आरोप केला.
राहुल गांधी हे देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना चोर म्हणतात या प्रश्नाचे उत्तर देताना चिदंबरम म्हणाले की, राजकरणात खालच्या पातळीवर जाऊन आरोप करण्याचा काम भाजप करत आहे. भाजपचे भाजप नेते वीपी सिंह यांनी सर्वात आधी राजीव गांधीना चोर म्हंटले होते. असे ते यावेळी म्हंटले .
साध्वी प्रज्ञा ठाकुर यांना भाजपने उमेदवारी देणे म्हणजे लोकशाही साठी हा मोठा धक्का आहे. जो पर्यंत आरोप सिध्द होत नाही, तो पर्यंत निवडणुकीत उमेदवारी देण्यात गैर नाही. पण, दिग्विजय सिंह यांच्याविरोधात भाजपला दहशतवादी असल्याचे आरोप असलेली व्यक्ती सोडून दुसर कुणी मिळाला नही का ? असा सवाल यावेळी चिदंबरम यांनी उपस्थित केला