'तुमचे वडील तर...', राजीव गांधींविषयीच्या राहुल यांच्या ट्विटला अभिनेत्रीचे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 01:13 PM2019-05-06T13:13:47+5:302019-05-06T13:59:12+5:30
राजीव गांधी यांना पक्षातील नेत्यांनी क्लिन चिट दिले होते. परंतु, ते एक नंबरचे भ्रष्टाचारी होते, अशी टीका मोदींनी केली होती. देश चुका माफ करू शकतो, परंतु, धोक्याला कधीही माफी नसते, असंही मोदी म्हणाले होते.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांचे वडील आणि दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर भ्रष्ट्राचारी असल्याचा आरोप केला होता. त्याला राहुल गांधी यांनी ट्विट करून शालीनतेने प्रत्युत्तर दिले होते. राहुल यांच्या याच ट्विटला बॉलिवूड अभिनेत्री गोहर खान हिने उत्तर दिले आहे.
राजीव गांधी यांना पक्षातील नेत्यांनी क्लिन चिट दिले होते. परंतु, ते एक नंबरचे भ्रष्टाचारी होते, अशी टीका मोदींनी केली होती. देश चुका माफ करू शकतो, परंतु, धोक्याला कधीही माफी नसते, असंही मोदी म्हणाले होते. या वक्तव्यानंतर मोदींवर चहुबाजुने टीका झाली होती. तर राहुल गांधी यांनी अत्यंत सर्जनशीलतेने मोदींनी प्रत्युत्तर दिले होते. तसेच सोशल मीडियावर अजुनही मोदींवर टीका करण्यात येत आहे. यामध्ये आता बॉलिवूड अभिनेत्री आणि बीग बॉस विजेती गोहर खान हिने देखील उडी घेतली आहे.
Modi Ji,
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 5, 2019
The battle is over. Your Karma awaits you. Projecting your inner beliefs about yourself onto my father won’t protect you.
All my love and a huge hug.
Rahul
राहुल यांनी ट्विट केले होते की, मोदीजी, लढाई संपली आहे. तुमची कर्म तुमची वाट पाहत आहेत. माझ्या वडिलांवर आरोप करुन तुम्ही वाचू शकणार नाही,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. मोदींनी प्रचारसभेत बोलताना बोफोर्स घोटाळ्यावरुन राजीव गांधींवर निशाणा साधला होता.
Huge respect for u !!! Your father late #RajivGandhiji was a dignified n loved prime minister!! It’s easy to be complexed by his stature !!the way you look past , is evidence of you knowing that fact !! Your grace is what shines through !! #morePower to you !! @RahulGandhihttps://t.co/qDKyiv6HCQ
— Gauahar Khan (@GAUAHAR_KHAN) May 5, 2019
राहुल यांच्या ट्विटला उत्तर देताना गोहर खान हिने ट्विट केले की, तुमच्याविषयी आदर आहे. तुमचे वडील स्वर्गीय राजीव गांधी सन्मानिय व्यक्तीमत्व होते. तसेच सर्वांना हवेसे वाटणारे पंतप्रधान होते. त्यांच्या लोकभिमुख प्रतिमेमुळे जळजळ होणे स्वाभाविकच असा टोला मोदींना लगावला. तसेच तुम्ही संयम राखला. त्यामुळे तुम्ही आणखी मजबूत व्हाल, असंही गोहर खान हिने राहुल गांधी यांना उद्देशून म्हटले आहे.