डोन्ट कॉल मी राहुल! काँग्रेस अध्यक्षांसारखा दिसू नये म्हणून मोदी समर्थकाचा मेकओव्हर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 11:00 AM2019-05-09T11:00:14+5:302019-05-09T11:02:08+5:30

20 किलो वजन वाढवलं; दाढी ठेवण्यास सुरुवात

lok sabha election 2019 prashant sethi who look like congress president rahul gandhi but change his look | डोन्ट कॉल मी राहुल! काँग्रेस अध्यक्षांसारखा दिसू नये म्हणून मोदी समर्थकाचा मेकओव्हर

डोन्ट कॉल मी राहुल! काँग्रेस अध्यक्षांसारखा दिसू नये म्हणून मोदी समर्थकाचा मेकओव्हर

Next

सूरत: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसारखं दिसू नये यासाठी भाजपा समर्थकानं वजन वाढवलं आहे. याशिवाय हेअर स्टाइलदेखील बदलली आहे. गुजरातच्या सूरतमध्ये राहणारे प्रशांत सेठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसारखे दिसायचे. मात्र ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळेच कोणी राहुल गांधींच्या नावानं हाक मारू नये, यासाठी सेठींनी 20 किलो वजन वाढवून 'मेकओव्हर' केला आहे. 

प्रशांत सेठी काही महिन्यांपूर्वी अगदी राहुल गांधींसारखे दिसायचे. 2014 च्या निवडणुकीवेळी तर त्यांना पाहायला मोठी गर्दी जमायची. प्रशांत दुकानात गेल्यावर अनेक जण गोळा व्हायचे. मात्र त्यानंतर प्रशांत यांनी स्वत:चा लूक बदलला. त्यामुळे पाच वर्षांपूर्वीचे प्रशांत आणि आताचे प्रशांत यांच्यात मोठा फरक आहे. राहुल गांधीसारखं दिसत असल्यानं त्रास झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळेच प्रशांत यांनी लूक बदण्याकडे कटाक्षानं दिलं आणि 20 किलोनं वजन वाढवलं. याशिवाय क्लिन शेव्ह करण्याऐवजी दाढी वाढवण्यास सुरुवात केली. 

प्रशांत सेठी यांना पंतप्रधान मोदींवरील चित्रपटात राहुल गांधींची भूमिका साकारण्याची ऑफर होती, असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. मात्र सेठी यांनी भूमिकेला नकार दिला. 'राहुल गांधी राष्ट्रीय नेते आहेत आणि मी त्यांचा आदर करतो. पण मी नरेंद्र मोदींचा समर्थक आहे. त्यामुळेच मी बॉलिवूडच्या चित्रपटात राहुल गांधी साकारण्यास नकार दिला,' असं सेठींनी सांगितलं. एक नागरिक म्हणून मला राहुल गांधींकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र पाच वर्षांत त्यांना कोणतीही मोठी कामगिरी करता आली नाही, असंदेखील ते पुढे म्हणाले. 
 

Web Title: lok sabha election 2019 prashant sethi who look like congress president rahul gandhi but change his look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.