...जेव्हा राहुल गांधी करतात हेलिकॉप्टरची दुरुस्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 02:42 PM2019-05-11T14:42:59+5:302019-05-11T14:52:07+5:30

हेलिकॉप्टरच्या दरवाजाच्या रबर निघाला असल्याचे लक्षात येताच पायलट त्याला बसवण्याच्या प्रयत्न करत होता. हे जेव्हा राहुल यांच्या लक्षात आलं तेव्हा ते स्वत: पायलटला मदत करण्यासाठी पुढे सरसावले.

lok sabha election 2019 Rahul Gandhi repair helicopter | ...जेव्हा राहुल गांधी करतात हेलिकॉप्टरची दुरुस्ती

...जेव्हा राहुल गांधी करतात हेलिकॉप्टरची दुरुस्ती

Next

मुंबई - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी कधी शेतकर्‍याच्या घरी पोहचता, तर कधी गरिबाच्या घरी जाऊन जेवण करतात. आपल्या या अचानक भेटी मुळे राहुल गांधी नेहमी चर्चेत राहिले. राहुल गांधी आता पुन्हा चर्चेत आले त्यांच्या, एका व्हायरल व्हिडिओमुळे. हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यानंतर पायलटला मदत करतानाचा त्यांच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हिमाचल प्रदेशातल्या ऊना इथं राहुल गांधी सभेसाठी शुक्रवारी आले होते. हेलिकॉप्टरचा दरवाजा बंद करण्यात अडचण येत  असल्याची माहिती राहुल यांनी पायलटला दिली. हेलिकॉप्टरच्या दरवाजाच्या रबर निघाला असल्याचे लक्षात येताच पायलट त्याला बसवण्याच्या प्रयत्न करत होता. हे जेव्हा राहुल यांच्या लक्षात आलं तेव्हा ते स्वत: पायलटला मदत करण्यासाठी पुढे सरसावले. त्यांचा हा व्हिडिओ कॉंग्रेसच्या फेसबुक पेजवर शेयर करण्यात आला आहे.



लोकसभा निवडणुकीतील सहाव्या टप्प्यात होत असलेल्या निवडणुकीच्या प्रचार करण्यासाठी राहुल गांधी हिमाचल प्रदेशाच्या दौऱ्यावर होते. राहुल यांनी यावेळी आपल्या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. मोदी हे काँग्रेस सोबत कबड्डीचा खेळ खेळत आहे. या खेळात त्यांचा लवकरच पराभव होणार असल्याचा दावा राहुल यांनी केला.

ऊना येथे पोहोचल्यावर राहुलने सुरक्षा कवच तोडून जवळच्या घराजवळ पोचले. यामुळे घरात असलेल्या मुलाला आश्चर्य वाटले. यानंतर राहुलने मुलांना आपल्याकडे बोलावून त्यांच्याबरोबर सेल्फी घेतला. हा व्हिडिओ राहुल गांधींनी आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट केला आहे.

 

Web Title: lok sabha election 2019 Rahul Gandhi repair helicopter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.