'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 05:27 PM2024-05-03T17:27:25+5:302024-05-03T17:28:19+5:30
'पाकिस्तानात राहुल गांधी अत्यंत लोकप्रिय आहेत. जर पाकिस्तानात एखादी निवडणूक झाली, तर राहुल गांधी तेथून मोठ्या फरकाने नक्की निवडून येतील,' असे हिमंता यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानचे माजी मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यंचे कौतुक केले. यानंतर, आता तो भारताच्या लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचा मुद्दा बनला आहे. यावरूनच आता आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी यावरून टोमणा मारला आहे. 'पाकिस्तानातराहुल गांधी अत्यंत लोकप्रिय आहेत. जर पाकिस्तानात एखादी निवडणूक झाली, तर राहुल गांधी तेथून मोठ्या फरकाने नक्की निवडून येतील,' असे हिमंता यांनी म्हटले आहे.
आम्ही पाकिस्तानात राहुल यांच्या विरोधात जिंकू शकणार नाही -
फवाद चौधरी यांनी केलेल्या राहुल गांधीं यांच्या स्तुतीसंदर्भात विचारले असता हिमंता म्हणाले, 'राहुल गांधी तेथून (पाकिस्तान) उभे राहिले तर, नक्कीच मोठ्या मतांधिक्याने विजयी होतील. आम्ही पाकिस्तानात राहुल यांच्या विरोधात जिंकू शकणार नाही. राहुल गांधी पाकिस्तानातील निवडणुकीत नक्कीच जिंकतील. मात्र, सत्य असे आहे की, पाकिस्तानला जे हवे आहे, भारतात त्याच्या उलटे होणार.
'भारत केवळ नरेंद्र मोदीच पंतप्रधान राहणार' -
राहुल गांधींवर निशाणा साधताना हिमंता म्हणाले, पाकिस्तानात राहुल गांधी अत्यंत प्रसिद्ध आहेत. ते तेथून सह निवडणूक जिंकू शकतात. मात्र, ते भारतात जिंकू शकत नाही. भारतत तर केवळ नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान राहणार.'
#WATCH बजाली: पाकिस्तान के पूर्व मंत्री चौधरी फवाद हुसैन के कांग्रेस नेता राहुल गांधी की तारीफ करने पर असम के मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा ने कहा, "पाकिस्तान में राहुल गांधी बहुत ज्यादा लोकप्रिय हैं। पाकिस्तान में अगर चुनाव होता है और राहुल गांधी चुनाव में खड़े होते हैं तो राहुल… pic.twitter.com/oLNZ4iALT9
— ANI_HindiNews (@AHindinews) May 3, 2024
काय म्हणाले होते फवाद? -
पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी नुकताच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर राहुल गांधींचे कौतुक करणारा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ते पंतप्रधान मोदी सरकारवर बड्या उद्योगपतींशी मिलीभगत असल्याचा आरोप करताना दिसत होते. हा व्हिडिओ शेअर करताना फवाद यांनी 'राहुल गांधी ऑन फायर', असे लिहिले होते. हा व्हिडिओ समोर आल्यापासून, भाजपाने राहुल गांधींवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे.