इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचे दावेदार कोण? खरगे यांनी दिले उत्तर; जागाही सांगितल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 04:37 PM2024-05-31T16:37:23+5:302024-05-31T16:39:53+5:30
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी विजय मिळवेल असा दावा मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.
Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीतील प्रचार सभांच्या तोफा काल सायंकाळी ५ वाजता थंडावल्या आहेत, उद्या १ जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदान होणार असून ४ जून रोजी लोकसभेचे निकाल समोर येणार आहेत. दरम्यान, आता लोकसभा निकालाबाबत वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 'एबीपी न्यूज' या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी पंतप्रधानपदाबाबतही भाष्य केलं आहे.
कोकण पदवीधर निवडणुकीत मनसे बाजी मारणार?; "राज ठाकरेंचा डाव खरा ठरणार..."
यावेळी मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. "यावेळी आम्ही सरकार स्थापन करणार आहोत. इंडिया आघाडीला २७५ पेक्षा जास्त जागा मिळतील, यावेळी आम्हाला सर्व बाजूंनी चांगले अहवाल आले आहेत. इंडिया आघाडीच्या वतीने भाजप पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहे. त्यावर उत्तर देताना खरगे म्हणाले, 'निवडणुकीनंतर घटक पक्षांची बैठक होऊन या विषयावर निर्णय घेतला जाईल.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपताच पंतप्रधान मोदी गुरुवारी ३० मे संध्याकाळी कन्याकुमारीला गेले आहेत. कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियलच्या ध्यान मंडपममध्ये त्यांचे ४५ तासांचे ध्यान चालू आहे. यावरही निशाणा साधत मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, ही तपश्चर्या म्हणजे शो आहे. जर त्यांना तपश्चर्या करायची असेल तर ते घरी बसूनही करू शकतात. दहा हजार पोलिसांसोबत तुम्ही कोणतीही तपश्चर्या करू शकत नाही. ते फक्त ढोंग करत आहेत. जर त्यांना एखाद्या गोष्टीसाठी पश्चात्ताप करायचा असेल तर ते घरी तपश्चर्या करून ते करू शकतात, असा टोलाही खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.
लोकांनी निवडले जगण्याशी संबंधित मुद्दे
खरगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, भाजपने फूट पाडण्याचा प्रयत्न केला, मात्र लोकांनी जगण्याशी संबंधित मुद्दे निवडले. आम्हाला विश्वास आहे की, जनता ४ जून रोजी पर्यायी सरकारसाठी जनादेश देईल आणि ‘इंडिया’ आघाडी नवीन सरकार स्थापन करेल. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.
पंतप्रधान मोदींवर टीका करताना काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, जर तुम्हाला महात्मा गांधी आणि त्यांच्या कार्याबद्दल माहिती नसेल तर कदाचित तुम्हाला संविधानाचीही माहिती नसेल. मी पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही. पक्षाला मला न मागता सर्वकाही दिले नाही, पक्षाचे अध्यक्षपद दिले आहे, असे खरगे म्हणाले.