Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 07:16 PM2024-06-01T19:16:27+5:302024-06-01T19:20:17+5:30
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील आज मतदान पार पडले. दरम्यान,आता एक्झिट पोलचे आकडे समोर येण्यास सुरुवात झाली आहे.
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 ( Marathi News ): लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील म्हणजेच सातव्या टप्प्यातील मतदान आज पार पडले आहे. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येणार आहेत. दरम्यान, याआधी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. यात धक्कादायक अंदाज वर्तवण्यात आले आहेत, कर्नाटक लोकसभा निवडणुकीतील एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत.
इंडिया टुडे-ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, कर्नाटकात एनडीएला २३ ते २५ जागा मिळताना दिसत आहेत. तर, इंडिया आघाडीला ३ ते ५ जागा मिळताना दिसत आहेत.
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा
एक्झिट पोलमध्ये एनडीएला ग्रामीण भागात ५६ टक्के आणि शहरी भागात ५४ टक्के मते मिळताना दिसत आहेत. इंडिया आघाडीला ग्रामीण भागात ४० टक्के आणि शहरी भागात ४२ टक्के मते मिळत असल्याचे दिसते. तर इतरांना ४ टक्के मते मिळत असल्याचे दिसत आहे.
२८ जागांसाठी मतदान
कर्नाटकच्या २८ लोकसभा जागांसाठी २६ एप्रिल आणि ७ मे रोजी दोन टप्प्यात मतदान झाले. २६ एप्रिल रोजी कर्नाटकातील उडुपी-चिकमगलूर, हसन, दक्षिण कन्नड, चित्रदुर्ग, तुमकूर, मंड्या, म्हैसूर, चामराजनगर, बंगळुरू ग्रामीण, बंगलोर उत्तर, बंगळुरू मध्य, बंगळुरू दक्षिण, चिक्कबल्लापूर आणि कोलार या १४ जागांवर मतदान होणार आहे घातले. तर ७ मे रोजी चिकोडी, बेळगाव, बागलकोट, विजापूर, गुलबर्गा, रायचूर, बिदर, कोप्पल, बेल्लारी, हावेरी, धारवाड, उत्तरा कन्नड, दावणगेरे आणि शिमोगा या उर्वरित १४ जागांवर मतदान झाले. कर्नाटकात पहिल्या टप्प्यात १४ जागांवर ६९.९६ टक्के मतदान झाले. तर दुसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी १४ जागांवर ६९.५६ टक्के मतदान झाले.
देशात इंडिया आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल; खरगेंचा दावा
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एक बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये इंडिया आघाडीतील अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. दरम्यान, यावेळी मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की इंडिया आघाडी २९५ हून अधिक जागांवर जय़ मिळवले. हा जनतेचा सर्वे आहे. एक्झिट पोलवर भाजपावाले चर्चा करतील. तसेच नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करतील. मात्र आम्ही एक्झिट पोलचं सत्य जनतेसमोर आणू इच्छितो. आम्ही २९५ पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवत आहोत. इंडिया आघाडीच्या जागा यापेक्षा कमी येणार नाहीत.