उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 06:15 AM2024-06-02T06:15:46+5:302024-06-02T06:17:57+5:30

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 :टाइम्स नाऊ नवभारत ईटीजीच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला ६६ ते ७० जागा मिळण्याची शक्यता आहे. 

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : Modi wave again in North, Rahul-Akhilesh floor | उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा

उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा

नवी दिल्ली : मागच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने उत्तर प्रदेशात निर्विवाद वर्चस्व राखताना मोठा विजय मिळविला होता. यंदाच्या निवडणुकीत अखिलेश यादवराहुल गांधी यांनी भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले होते. त्यामुळे उत्तर प्रदेशात काय निकाल लागतो याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. परंतु, एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशात भाजपला पुन्हा एकदा मोठे यश मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. 

टाइम्स नाऊ नवभारत ईटीजीच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला ६६ ते ७० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर सपा आणि काँग्रेसच्या 
इंडिया आघाडीला १० ते १३ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच इतरांना ० ते १ जागा मिळू शकतात. पक्षनिहाय विचार केल्यास भाजपला ६१ ते ६४, तर सपाला ९ ते ११ जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला १ ते २, आरएलडीला १ ते २ आणि सुभासपाला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. इतरांच्या खात्यात एक जागा जाईल. तर पीएमएआरक्यूच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला ६९ ते ७४, इंडिया आघाडीला ६ ते ११ जागा मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : Modi wave again in North, Rahul-Akhilesh floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.