भाजपाला २०१ जागांवर पराभूत करणारे 'ते' पक्ष कोणते?; काँग्रेसचा आकडा पाहून चकीत व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 05:44 PM2024-06-08T17:44:44+5:302024-06-08T17:45:20+5:30

loksabha election result - लोकसभा निवडणुकीच्या निकालात यंदा काँग्रेसनं दमदार कामगिरी केली असून यावेळी त्यांच्या जागांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. तर भाजपाला जवळपास २०१ जागांवर पराभव सहन करावा लागला. 

Lok Sabha Election Results - Which parties defeated BJP in 201 seats in how many seats? Congress most | भाजपाला २०१ जागांवर पराभूत करणारे 'ते' पक्ष कोणते?; काँग्रेसचा आकडा पाहून चकीत व्हाल

भाजपाला २०१ जागांवर पराभूत करणारे 'ते' पक्ष कोणते?; काँग्रेसचा आकडा पाहून चकीत व्हाल

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालात यंदा काँग्रेससह इंडिया आघाडीनं सत्ताधारी भाजपाच्या नाकीनऊ आणले. अबकी बार ४०० पार असा नारा देणाऱ्या भाजपाला स्वबळावर २४० जागा मिळाल्या तर त्यांच्या घटक पक्षांना ५३ जागा मिळाल्या. एनडीएला या निकालात २९३ जागा तर इंडिया आघाडीला २३४ जागा मिळाल्या आहेत. त्यात ९९ जागा एकट्या काँग्रेसनं जिंकल्या आहेत. 

यंदाच्या निकालाची आकडेवारी पाहिली तर काँग्रेसनं इतिहासात पहिल्यांदा ३२७ जागा लढवल्या होत्या तर भाजपाने यंदा ४४१ जागांवर उमेदवार उभे केले होते. मागील २ निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपा यांच्यातील थेट लढतीत भाजपाला फायदा होताना दिसत होतं. परंतु या निवडणुकीत काँग्रेसनं त्यांचा स्ट्राईक रेट वाढवला आणि तब्बल ८० हून अधिक जागांवर भाजपा उमेदवाराचा पराभव केला. 

भाजपानं जिंकलेल्या २४० जागांवर कोणते पक्ष पराभूत?

काँग्रेस - १५३
समाजवादी पार्टी - २१
बीजू जनता दल - २० 
तृणमूल काँग्रेस - १३
आप - ७
राष्ट्रीय जनता दल - ७
शिवसेना (उबाठा) - ३
वायएसआर काँग्रेस - ३
बसपा - २
सीपीआय - २
राष्ट्रवादी शरद पवार गट - २
आसाम जातीय परिषद - १
सीपीआय एमएल - १
सीपीएम - १
अपक्ष - १
झारखंड मुक्ती मोर्चा - १
विकासशील इन्सान पार्टी - १
बिनविरोध - १

एकूण - २४० जागा

भाजपा पराभूत झालेल्या २०१ जागांवर या पक्षांनी मारली बाजी 

काँग्रेस - ८४
समाजवादी पार्टी - ३५
तृणमूल काँग्रेस - २९
डीएमके - १२
राष्ट्रवादी शरद पवार गट - ६
अपक्ष - ५
आप - ३
सीपीएम - ३
झारखंड मुक्ती मोर्चा - ३
राष्ट्रीय जनता दल - ३
वायएसआर काँग्रेस - ३
सीपीआय - १
मुस्लीम लीग - २
एआयएमआयएम - १
सीपीआय एमएल - १
आरएसपी - १
शिवसेना उबाठा - १
आझाद समाज पार्टी - १
भारत आदिवासी पार्टी - १
राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी - १
शिरोमणी अकाली दल - १
सिक्किम क्रांतीकारी मोर्चा - १
विधुथलाई सी कात्ची - १
झोरम पीपल मूवमेंट - १

एकूण - २०१
 

Web Title: Lok Sabha Election Results - Which parties defeated BJP in 201 seats in how many seats? Congress most

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.