सत्तर वर्षांत नोटबंदीसारखा मुर्खपणा कोणत्याही पंतप्रधानांनी केला नाही : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 04:40 PM2019-04-27T16:40:59+5:302019-04-27T16:43:31+5:30

काळा पैसा परत आणण्यासाठी नोटबंदी होती, तर मग बँकेच्या रांगेत गरीब शेतकरी का होता, चोर का नव्हते, असा सवाल राहुल यांनी उपस्थित केला. मोदींनी तुमच्या खिशातून पैसे काढून आपल्या निवडक १५ मित्रांचे खिसे भरल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

lok sabha elections 2019 rahul gandhi attacks on pm narendra modi | सत्तर वर्षांत नोटबंदीसारखा मुर्खपणा कोणत्याही पंतप्रधानांनी केला नाही : राहुल गांधी

सत्तर वर्षांत नोटबंदीसारखा मुर्खपणा कोणत्याही पंतप्रधानांनी केला नाही : राहुल गांधी

googlenewsNext

रायबरेली - २०१४ मध्ये बहुमताने केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपला नोटबंदीचा निर्णय चांगलाच महागात पडण्याची चिन्हे आहेत. विरोधकांकडून नोटबंदीच्या मुद्दावर सत्ताधाऱ्यांवर सतत धारेवर धरले जात आहे. आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदार संघात आयोजित सभेत राहुल गांधी बोलत होते. यावेळी राहुल यांनी 'चौकीदार चोर है'चा नारा देखील दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रत्येक सभेत मागील सत्तर वर्षात काहीच झालं नाही, हे सांगत असतात. यावेळी मात्र राहुल गांधी यांनी ७० वर्षांचा मुद्दा घेत मोदींवर टीका केली. मागील ७० वर्षांत कोणत्याही पंतप्रधानाने नोटबंदी सारखा मुर्खपणाचा निर्णय घेतला नसल्याचे राहुल यांनी म्हटले. तसेच काळा पैसा परत आणण्यासाठी नोटबंदी होती, तर मग बँकेच्या रांगेत गरीब शेतकरी का होता, चोर का नव्हते, असा सवाल राहुल यांनी उपस्थित केला. मोदींनी तुमच्या खिशातून पैसे काढून आपल्या निवडक १५ मित्रांचे खिसे भरल्याचा आरोपही राहुल यांनी केला.

देशातील एकही तरुण तुम्हाला म्हणणार नाही, की मोदींनी मला नोकरी दिली. त्याचे कारण म्हणजे देशातील बेरोजगारीने मागील ४५ वर्षांतील उच्चांकी गाठली आहे. ७० वर्षांत नोटबंदीसारखा मुर्खपणा कुणीही केला नाही. नरेंद्र मोदींनी गरीबांचा पैसा हिसकावला. वाजपेयी यांनी देखील अशा पद्धतीने देश चालवाल नाही, असंही राहुल म्हणाले.

दरम्यान देशात सध्या २२ लाख सरकारी पदे रिक्त आहेत. मात्र ही पदे भरण्याची इच्छा शक्ती मोदींमध्ये नाही. सत्तेत आल्यानंतर काँग्रेस ही पदे भरणार आहे. एका वर्षात ही कामगिरी करून दाखवू असं वचन राहुल यांनी येथील जनतेला दिले.

Web Title: lok sabha elections 2019 rahul gandhi attacks on pm narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.