पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे मी माफी मागतो - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 04:08 PM2019-03-16T16:08:43+5:302019-03-16T16:17:00+5:30
उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये आयोजित जनसभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल डील, जीएसटी आणि किसान सन्मान योजनेवरुन हल्लाबोल केला.
डेहराडून : उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये आयोजित जनसभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल डील, जीएसटी आणि किसान सन्मान योजनेवरुन हल्लाबोल केला. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. जीएसटीच्या या मोठ्या चुकीमुळे नरेंद्र मोदी यांच्यातर्फे मी आपली माफी मागतो, असे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.
जीएसटीच्या मुद्द्यावरुन व्यापारांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, 'आम्ही गब्बर सिंह टॅक्सला खऱ्या जीएसटीमध्ये बदल करु. ज्यामध्ये एक साधारण टॅक्स असेल. सीएसटीमुळे आपले नुकसान झाले आणि त्यासाठी तुम्हाला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मी माफी मागतो. त्यांनी मोठी चूक केली आहे, ती आम्ही दुरुस्त करु.'
LIVE: Congress President @RahulGandhi addresses Parivartan Rally in Dehradun. #DevbhoomiWithRahulGandhihttps://t.co/aLbfNcOlhN
— Congress (@INCIndia) March 16, 2019
याचबरोबर, किसान सन्मान योजनेवरुन राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला. संसदेत शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून प्रतिदिन साडे तीन रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी भाजपा खासदारांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून टाळ्या वाजवल्या, असे सांगत राहुल गांधी यांनी 'एका चोराला तुम्ही तीस हजार कोटी रुपये देता. मात्र, देशातील शेतकऱ्यांसाठी तुम्ही दिवसाला साडे तीन रुपये देता आणि मूर्ख बनवण्यासाठी टाळ्या वाजवता.' अशा शब्दांत हल्लाबोल केला.
नरेन्द्र मोदी ने हिंदुस्तान के किसान को दिन के साढ़े तीन रुपये दिये और उसके लिये बीजेपी के सारे एमपी ताली बजा रहे थे। शर्म आनी चाहिए! : कांग्रेस अध्यक्ष @RahulGandhi#DevbhoomiWithRahulGandhipic.twitter.com/0mGXzvCPdh
— Congress (@INCIndia) March 16, 2019
मोदी जी ने आपको कहा था 15 लाख रुपये हर व्यक्ति के बैंक खाते में डालेंगे, हर साल 2 करोड़ युवाओं को नौकरी देंगे। देश में 45 साल में सबसे ज्यादा बेरोजगारी आज है : कांग्रेस अध्यक्ष @RahulGandhi#DevbhoomiWithRahulGandhipic.twitter.com/tyYoQgK7X8
— Congress (@INCIndia) March 16, 2019
In Parliament, I questioned Mr. Modi on #RafaleScam. Why was Anil Ambani given the deal? Why did you steal the job opportunities from our youth? Mr. Narendra Modi could not meet my eyes: Congress President @RahulGandhi#DevbhoomiWithRahulGandhipic.twitter.com/ivflrjb6Xi
— Congress (@INCIndia) March 16, 2019