राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवणार?; काँग्रेसच्या नेत्याने स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 12:28 PM2024-03-06T12:28:43+5:302024-03-06T12:28:57+5:30

Congress Rahul Gandhi : नवी दिल्लीतील महत्त्वाच्या बैठकीनंतर परतलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप सिंघल यांनी बुधवारी महत्त्वाची माहिती दिली.

Lok Sabha Electoin 2024 up district congress president claims Rahul Gandhi will contest loksabha elections from amethi | राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवणार?; काँग्रेसच्या नेत्याने स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवणार?; काँग्रेसच्या नेत्याने स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

काँग्रेसचे नेते राहुल गांधी 2024 ची लोकसभा निवडणूक अमेठीतून लढवणार असल्याचा दावा अमेठी जिल्हा काँग्रेस अध्यक्षांनी केला आहे. नवी दिल्लीतील महत्त्वाच्या बैठकीनंतर परतलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप सिंघल यांनी बुधवारी सांगितलं की, राहुल गांधी अमेठीतून काँग्रेसचे उमेदवार असतील, यासंबंधित घोषणा लवकरच केली जाईल.

प्रदीप सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीची तयारी सुरू झाली असून, कार्यकर्त्यांनी जबाबदारी पार पाडण्याची तयारी केली आहे. राहुल गांधी 2002 ते 2019 पर्यंत अमेठीचे खासदार होते. मात्र भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्या स्मृती इराणी यांच्याकडून 2019 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. राहुल गांधी सध्या केरळच्या वायनाडमधून खासदार आहेत.

सध्या राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. शाजापूरमध्ये राहुल गांधी म्हणाले की," पूर्वी देशातील तरुण जेव्हा सैन्यात भरती व्हायचे तेव्हा लष्कर त्यांच्या संरक्षणाची हमी देत ​​असे. सैनिक शहीद झाला तर त्याला शहीद दर्जा मिळतो. आता मोदी सरकारने अग्निवीरला सैन्यात आणल्याने सैनिकांमध्ये भेदभाव निर्माण झाला आहे."

"...आता सर्व मार्ग बंद झालेत, दीड लाख तरुणांची काय चूक होती?"

"कोरोनाच्या वेळी देशातील दीड लाख तरुणांची सैन्यात निवड झाली, मात्र तीन वर्षांनंतरही ते रुजू झालेले नाहीत. आता त्यांचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. अखेर या दीड लाख तरुणांची चूक काय होती?" असा सवाल देखील विचारला आहे.  शेतकऱ्यांबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, "आमचे सरकार सत्तेवर येताच आम्ही शेतकऱ्यांना एमएसपीची हमी देऊ." मध्य प्रदेशात राहुल गांधी म्हणाले आहेत की, "देशात ओबीसी, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक वर्गातील सुमारे 90% लोक आहेत."

"गरिबांच्या मुलांसाठी सर्व मार्ग बंद झाले”

"देशातील मोठमोठ्या कंपन्यांच्या व्यवस्थापनात तुम्हाला ओबीसी, दलित किंवा आदिवासी समाजातील एकही व्यक्ती सापडणार नाही. हा सामाजिक अन्याय आहे, जो देशातील जवळपास प्रत्येक संस्थेत होत आहे. गरिबांची मुले अनेक वर्षे मेहनतीने अभ्यास करतात. पण पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर जाताच तिथल्या श्रीमंतांच्या मुलांच्या मोबाईलमध्ये आधीच पेपर असतो. परीक्षेचा पेपर फुटतो. म्हणजे आज गरिबांच्या मुलांसाठी सर्व मार्ग बंद झाले आहेत."
 

Web Title: Lok Sabha Electoin 2024 up district congress president claims Rahul Gandhi will contest loksabha elections from amethi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.