अहंकारामुळे 2014 मध्ये हरलो; 2019 मध्ये भाजप-संघाविरोधात सर्व विरोधकांमध्ये लढाई : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 04:16 PM2018-08-25T16:16:05+5:302018-08-25T16:20:46+5:30

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला

Lost in 2014 due to ego; In 2019, all the opposition fight against BJP-RSS: Rahul Gandhi | अहंकारामुळे 2014 मध्ये हरलो; 2019 मध्ये भाजप-संघाविरोधात सर्व विरोधकांमध्ये लढाई : राहुल गांधी

अहंकारामुळे 2014 मध्ये हरलो; 2019 मध्ये भाजप-संघाविरोधात सर्व विरोधकांमध्ये लढाई : राहुल गांधी

Next

लंडन : सलग 10 वर्षे सत्तेत राहिल्याने आलेल्या अहंकारामुळे 2014 मध्ये हरलो. मात्र, 2019 मधील लोकसभा निवडणूक भाजप-संघाविरोधात सर्व विरोधी पक्ष लढणार आहेत. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताच्या शक्तीस्थानांवर हल्ला केला गेला आहे. यामुळे भाजपला हरविणे आणि स्वायत्त संस्थांवर होत असलेले हल्ले रोखणे हेच काँग्रेसचे लक्ष्य असेल असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले. 


लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये विद्यार्थ्यांशी राहुल बोलत होते. यावेळी राहुल यांनी राफेल गैरव्यवहार, भ्रष्टाचार, महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. आम्ही भारतीय संविधानावर होत असलेल्या आक्रमनाला रोखत आहोत. मी आणि पूर्ण विरोधी पक्षांचे देशात पसरविले जात असलेले विष रोखण्यासाठीच्या मुद्द्यावर एकमत झाले आहे. 2019 ची निवडणूक सरळ आहे. कारण भाजप- संघ विरोधात सर्व विरोधी पक्ष अशी सरळ लढाई होईल. कोणत्याही प्रकारच्या हिंसेची आपण कठोर शब्दांत निंदा करतो, असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

तसेच 1984 मध्ये हिंसा झाली होती. ती एक क्लेशकारक घटना होती. परंतु तुम्ही म्हणाल की यात काँग्रेसचा हात होता, तर याला आपण सहमत नसल्याचे राहुल गांधी म्हणाले.



 



 


यावेळी राहुल गांधी यांनी राफेल गैरव्यवहार, भ्रष्टाचार, महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. 

  • राफेल व्यवहार हा अशा उद्योगपतीला देण्यात आला, ज्याच्यावर 45 हजार कोटींचे कर्ज आहे. अनिल अंबानी यांनी आपल्या हयातीत कधी विमान बनविले नाही. खरेतर केंद्र सरकारने काही उद्योगपतींना फायदा पोहोचवण्यासाठीच राफेल व्यवहाराला बदलले. 
  • मी पंतप्रधानांना महिला आरक्षणावर पत्र लिहीले आहे. सरकार ज्या दिवशी हे विधेयक संमत करायला आणेल, तेव्हा पूर्ण काँग्रेस स्वखुशीने भाजपला मदत करेल, असे आश्वासन त्यांना दिले आहे. 
  • भारतात रोजगार मिळणे कठीण बनले आहे. शेजारील चीन 24 तासाला 50 हजार नोकऱ्या उपलब्ध करत आहे. या  काळात भारतात केवळ 450 नवे रोजगार उपलब्ध होतात. 
  • अल्पसंख्यांकांसाठी वेगळा देश हवा या मागणीचे आपण समर्थन करत नाही. भारताचा 70 वर्षांचा इतिहास पाहिल्यास सर्वाधिक अल्पसंख्यांक पुढे जाण्यात सक्षम आहेत .
  • मागील काही दशकांपर्यंत संसदेमध्ये होणाऱ्या चर्चेची गुणवत्ता चांगली होती. मात्र, आज होणाऱ्या चर्चा पाहिल्या तर गुणवत्ता घसरल्याचे दिसते.

Web Title: Lost in 2014 due to ego; In 2019, all the opposition fight against BJP-RSS: Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.