Madhya Pradesh Assembly Election 2018 : 'EVM ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रुमबाहेरील CCTV कॅमेरे बंद होते'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 08:38 AM2018-12-02T08:38:31+5:302018-12-02T08:45:24+5:30

Madhya Pradesh Assembly Election 2018 : मध्य प्रदेशमधील निवडणुकीतील निकाल बदलवण्यासाठी ईव्हीएममध्ये छेडछाड करण्याचे मोठे छड़यंत्र रचण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. काँग्रेसच्या या आरोपानंतर भोपाळमध्ये ज्या स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम ठेवण्यात आले होते, तेथील वीज पुरवठा अचानक खंडीत झाल्यानं सीसीटीव्ही कॅमेरे जवळपास तासभर बंद होते, ही बाब निवडणूक आयोगानंही मान्य केली आहे. 

Madhya Pradesh Assembly Election 2018 :election commission admits cctv failed for over an hour at evm strongroom in bhopal | Madhya Pradesh Assembly Election 2018 : 'EVM ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रुमबाहेरील CCTV कॅमेरे बंद होते'

Madhya Pradesh Assembly Election 2018 : 'EVM ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रुमबाहेरील CCTV कॅमेरे बंद होते'

Next
ठळक मुद्देभाजपाकडून EVMमध्ये छेडछाडीचा प्रयत्न, काँग्रेसचा आरोप स्ट्राँग रुमबाहेरील CCTV कॅमेरे तासभर होते बंद - निवडणूक आयोगस्टाँग रुमबाहेर निवडणूक आयोगाचा कडक पहारा तैनात

भोपाळ -  मध्य प्रदेशमधील निवडणुकीतील निकाल बदलवण्यासाठी ईव्हीएममध्ये छेडछाड करण्याचे मोठे छड़यंत्र रचण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. काँग्रेसच्या या आरोपानंतर भोपाळमध्ये ज्या स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम ठेवण्यात आले होते, तेथील वीज पुरवठा अचानक खंडीत झाल्यानं सीसीटीव्ही कॅमेरे जवळपास तासभर बंद होते, ही बाब निवडणूक आयोगानंही मान्य केली आहे. 
याबाबत निवडणूक आयोगानं म्हटलंय की, सागरमध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्णतः पार पडल्यानंतर दोन दिवसांनंतर ईव्हीएम जमा केल्याप्रकरणी एका अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. भोपाळ आणि सागरमधील प्रकरण समोर आल्यानंतर ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. 

(भाजपाकडून EVM मध्ये छेडछाड होण्याची ज्योतिरादित्य सिंधिया यांना शंका)

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, भोपाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार 30 नोव्हेंबरला वीज पुरवठा खंडीत झाल्यानं स्ट्राँग रुमबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे आणि एलईडी डिस्पले सकाळी 8.19 वाजल्यापासून ते सकाळी 9.35 वाजेपर्यंत बंद होते. या कारणामुळे कोणतेही रेकॉर्डिंग होऊ शकले नाही. यानंतर एक अतिरिक्त एलईडी स्क्रीन, इनर्व्हटर आणि जेनरेटरची व्यवस्था करण्यात आली.  

निवडणूक आयोगाकडून असंही सांगण्यात आले आहे की, आता सर्व कॅमेरे व्यवस्थित काम करत आहेत आणि चोख सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे. स्ट्राँग रुमच्या उघडे ठेवण्यात आलेल्या एका दाराबाबतही काँग्रेसनं तक्रार केली होती. काँग्रेसच्या तक्राराची गांभीर्यानं दखल घेत हे दार तातडीनं बंद केले.  

(EVM वर संशय, काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे घेतली धाव)


जनमताच्या कौल बदलवण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून ईव्हीएममध्ये छेडछाड होऊ शकते, अशी भीती काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांना वाटत आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूमवर कडेकोट पहारा द्यावा, अशी मागणी केली होती.  कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आलेल्या ईव्हीएममध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत असल्याचा आरोपही ज्योतिरादित्य यांनी केला आहे.

''भाजपाला आपला पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे लोकशाही आणि जनमत यांना पायदळी तुडवण्यासाठी भाजपाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. हा सरकारी संरक्षणाखाली लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने लवकरात लवकर कठोर पावले उचलून दोषींवर कारवाई करून ईव्हीएमच्या सुरक्षेची खबरदारी घ्यावी, असेही सिंधिया यांनी म्हटले होते.

Web Title: Madhya Pradesh Assembly Election 2018 :election commission admits cctv failed for over an hour at evm strongroom in bhopal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.