Video: खासदार प्रज्ञा सिंह व्हिलचेअर सोडून थेट खेळाच्या मैदानावर, बास्केटबॉल खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 02:42 PM2021-07-02T14:42:06+5:302021-07-02T14:42:47+5:30

प्रज्ञा सिंह गुरुवारी भोपाळमधील शक्ती नगर येथील बास्केटबॉल मैदानावर वृक्षारोपण कार्यक्रमासाठी आल्या होत्या. यावेळी मैदानावर मुलांना खेळताना पाहून त्या त्यांच्या जवळ गेल्या आणि स्वतः खेळायलाही लागल्या.

Madhya Pradesh bjp MP Sadhvi Pragya Singh thakur plays basketball video viral on twitter | Video: खासदार प्रज्ञा सिंह व्हिलचेअर सोडून थेट खेळाच्या मैदानावर, बास्केटबॉल खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल

Video: खासदार प्रज्ञा सिंह व्हिलचेअर सोडून थेट खेळाच्या मैदानावर, बास्केटबॉल खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल

googlenewsNext

भोपाळ - मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथून भाजपच्या खासदार असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना आपण आतापर्यंत व्हिलचेअरवरच बघितले असेल. मात्र, त्या आता पूर्णपणे फिट झाल्या आहेत. सोशल मिडियावर त्यांचा एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्या बास्केटबॉल खेळताना दिसत आहेत. (Madhya Pradesh bjp MP Sadhvi Pragya Singh thakur plays basketball video viral on twitter)

प्रज्ञा सिंह गुरुवारी भोपाळमधील शक्ती नगर येथील बास्केटबॉल मैदानावर वृक्षारोपण कार्यक्रमासाठी आल्या होत्या. यावेळी मैदानावर मुलांना खेळताना पाहून त्या त्यांच्या जवळ गेल्या आणि स्वतः खेळायलाही लागल्या. यावेळीचा त्यांचा बास्केटबॉल खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा हा व्हिडिओ शेअर करत प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ता नरेंद्र सलूजा यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. सलूजा यांनी  ट्विट करत म्हटले आहे, 'भोपाळच्या भाजप खासदार साध्वी ठाकूर यांना आतापर्यंत व्हिलचेअरवरच पाहिले होते. मात्र आज त्यांना भोपाळमध्ये स्टेडिअममध्ये बास्केटबॉल खेळताना पाहून मोठा आनंद झाला... आतापर्यंत एवढेच माहीत होते, की कुण्या दुखापतीमुळे त्यांना व्यवस्थित उभे राहता अथवा चालता, फिरता येत नाही…? ईश्वर त्यांना नेहमीच ठणठणीत ठेवो...' सोशल मिडियावर बऱ्याच लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. यांपैकी अनेक लोकांनी, बास्केटबॉल हा परदेशी खेळ आहे, असे म्हणत साध्वी प्रज्ञा यांच्यावर निशाणाही साधला आहे.

एका यूझरने निशाणा साधत, बास्केटबॉल हा प्राचीन भारतीय खेळ आहे का? असा सवालही केला आहे. प्रज्ञा सिंह ठाकूर या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भोपाळ लोकसभा मतदारसंघातून खासदार झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांना पराभूत केले आहे. प्रज्ञा सिंह ठाकूर या अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्यांमुळेही चर्चेत राहतात.
 

Web Title: Madhya Pradesh bjp MP Sadhvi Pragya Singh thakur plays basketball video viral on twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.