"भारत महान नाही तर बदनाम झालाय, याला मोदी सरकार जबाबदार"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 06:16 PM2021-05-28T18:16:34+5:302021-05-28T18:24:34+5:30
madhya pradesh congress chief kamal nath : निवडणुकींच्या कालावधीमध्ये लसींसंदर्भात घोषणा करण्यात आल्या मात्र नंतर लसी मिळाल्याच नाहीत. आता ग्लोबल टेंडरबद्दल बोलत असल्याचा टोला कमलनाथ यांनी केंद्र आणि राज्य सरकारला लगावला.
भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मैहरमध्ये कोरोनामुळे मृत झालेल्या समाज सेवकाच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. त्यानंतर कमलनाथ यांनी सर्किट हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील शिवराज सिंह चौहान सरकार आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. भारत महान नाही बदनाम देश म्हणून ओळखला जात आहे. परिस्थिती अशी आहे की, विदेशातील भारतीय टॅक्सी चालकांच्या गाड्यांमध्ये प्रवासी बसण्यास तयार नाहीत. या परिस्थितीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे केंद्र सरकार जबाबदार आहे, असे म्हणत कमलनाथ यांनी जोरदार हल्लाबोल केला. (madhya pradesh congress chief kamal nath said india is not great now india is infamous)
मोदी सरकार ३० मे रोजी सात वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. या निमित्ताने मोदी सरकारने जनतेला उत्तरं द्यायला हवीत की देश केवळ घोषणांवर चालणार आहे का? रोजगार देणार होतात त्याचे काय झाले? महागाईचे काय झाले?, याची उत्तरे केंद्राने द्यावीत, अशी मागणी कमलनाथ यांनी केली आहे. याशिवाय, पत्रकार परिषदेमध्ये कमलनाथ यांनी भाजपा आणि भाजपा समर्थकांवर थेट आरोप करत मध्य प्रदेशात सध्या कोरोना माफिया तयार झाल्याचे म्हटले आहे.
2000 रुपयांच्या नोटांबद्दल मोठी बातमी #ReserveBankofIndia
— Lokmat (@MiLOKMAT) May 28, 2021
https://t.co/K5fdpCMslH
'मी कोरोना माफियांविरोधात शुद्धसाठी युद्ध सुरु केले. मात्र आज भाजपाचे नेते व्हेंटिलेटर्स, बेड्स, इंजेक्शन विकत आहेत. ज्या खड्ड्यात राज्याला ढकलले जात आहे तिथून राज्य बाहेर काढणे आव्हानात्मक आहे. मध्य प्रदेशची ७० टक्के अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये मध्य वर्गीयांची आर्थिक परिस्थिती चिंताजनक झाली आहे. खालच्या स्तरावरील मध्यम वर्गीय आता गरीब झालेत आणि गरीबांची परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे', असे कमलनाथ यांनी म्हटले आहे.
कोरोनामुळे जी परिस्थिती झाली आहे, त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप कमलनाथ यांनी केला आहे. दुसऱ्या लाटेची माहिती अनेक महिन्यांपासून होती, मात्र त्यासंदर्भातील तयारी करण्यात आली नाही. निवडणुकींच्या कालावधीमध्ये लसींसंदर्भात घोषणा करण्यात आल्या मात्र नंतर लसी मिळाल्याच नाहीत. आता ग्लोबल टेंडरबद्दल बोलत असल्याचा टोला कमलनाथ यांनी केंद्र आणि राज्य सरकारला लगावला.
नरेंद्र मोदी व राज्यपालांना ममता बॅनर्जींची अर्धा तास वाट पाहावी लागली, बैठकीत पोहोचल्या उशिरा https://t.co/tbMYJ22Y9X@BJP4India#MamataBanerjee#NarendraModi
— Lokmat (@MiLOKMAT) May 28, 2021
'धार्मिक स्थळी गेलो की भाजपाच्या पोटात दुखू लागते'
याचबरोबर, प्रश्न विचारल्यावर देशद्रोही आणि सत्य दाखवले तर एफआयआर दाखल केले जाते, असेही कमलनाथ म्हणाले. तसेच, मुख्यमंत्री शिवराज हे सर्व आकडेवारी जनतेसमोर का ठेवत नाहीत? किती जणांचे लसीकरण झाले हे उघडपणे का सांगत नाही?, असे सवाल कमलनाथ यांनी विचारले आहेत. आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना भाजपाकडे धर्माची ठेकेदारी देण्यात आलेली नाही. आम्ही सुद्धा धार्मिक आहोत पण आम्ही दिखावा करत नाही. मी कुठल्याही धार्मिक स्थळी गेलो की भाजपाच्या पोटात दुखू लागते, अशी टीका कमलनाथ यांनी केली आहे.