'...त्यावेळी पुजाऱ्यांना राहुल गांधींना सांगावं लागलं; हे मंदिर आहे, मशीद नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 04:20 PM2018-11-19T16:20:19+5:302018-11-19T16:24:07+5:30

योगी आदित्यनाथ यांची राहुल गांधींच्या मंदिर भेटींवर टीका

madhya pradesh elections 2018 up cm yogi adityanath slams rahul gandhi over his temple visits | '...त्यावेळी पुजाऱ्यांना राहुल गांधींना सांगावं लागलं; हे मंदिर आहे, मशीद नाही'

'...त्यावेळी पुजाऱ्यांना राहुल गांधींना सांगावं लागलं; हे मंदिर आहे, मशीद नाही'

googlenewsNext

भोपाळ: राहुल गांधी मंदिरात गुडघ्यावर बसले होते. त्यावेळी हे मंदिर आहे, मशीद नाही, याची आठवण त्यांना पुजाऱ्यांना करुन द्यावी लागली, अशा शब्दांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस अध्यक्षांवर निशाणा साधला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर गेलेले योगी आदित्यनाथ धारमध्ये जनसभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी राहुल यांच्या मंदिर भेटींवरुन त्यांना लक्ष्य केलं. 

राहुल गांधींनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यातील अनेक मंदिरांना भेटी दिल्या होत्या. त्यावेळीही भाजपाच्या नेत्यांनी त्यांच्यावर तोंडसुख घेतलं होतं. हाच मुद्दा योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा उपस्थित केला. निवडणुका जवळ आल्या की राहुल गांधी मंदिरांना भेटी देतात. गुजरात विधानसभा निवडणुकीवेळीदेखील त्यांनी हेच केलं होतं. त्यावेळी मंदिरात गेलेले राहुल गांधी गुडघ्यावर बसले होते. तेव्हा तिथल्या पुजाऱ्यांनी हे मंदिर आहे, मशीद नाही, याची आठवण त्यांना करुन दिली, अशा शब्दांमध्ये योगी आदित्यनाथांनी राहुल यांच्यावर टीकास्त्र सोडलं. 




मध्य प्रदेशात 28 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 11 डिसेंबरला मतमोजणी होईल. सध्या मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता आहे. मध्य प्रदेशात विधानसभेचे 230 मतदारसंघ आहेत. यातील 165 मतदारसंघ भाजपा, 58 मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. सलग 15 वर्ष सत्तेत असलेल्या भाजपासमोर यंदा काँग्रेसनं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक उत्कंठावर्धक ठरणार आहे. 

Web Title: madhya pradesh elections 2018 up cm yogi adityanath slams rahul gandhi over his temple visits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.