नगरपालिका निवडणुकीत अवघ्या 14 मतांनी पराभव; धक्क्याने काँग्रेस उमेदवाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 04:54 PM2022-07-17T16:54:29+5:302022-07-17T16:55:04+5:30

मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी नगरपालिका निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. भाजपने सतना, बुरहानपूर आणि खांडवा येथे निवडणुका जिंकल्या आहेत.

Madhya Pradesh rewa news; Congress candidate Harinaraya Gupta died after losing in municipal carporation eletion | नगरपालिका निवडणुकीत अवघ्या 14 मतांनी पराभव; धक्क्याने काँग्रेस उमेदवाराचा मृत्यू

नगरपालिका निवडणुकीत अवघ्या 14 मतांनी पराभव; धक्क्याने काँग्रेस उमेदवाराचा मृत्यू

googlenewsNext


रेवा: आज मध्य प्रदेशात अनेक नगरपालिका निवडणुकांचे निकाल लागत आहेत. यादरम्यान एक दुःखद बातमी समोर आली आहे. रेवा येथील हनुमाना नगरपालिकेच्या निवडणुकीत पराभव झाल्याचा धक्का बसल्याने काँग्रेस उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. 

हरिनारायण गुप्ता हे काँग्रेसच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक 09 मधून रिंगणात होते. अपक्ष उमेदवार अखिलेश गुप्ता यांनी अवघ्या 14 मतांनी हरिनारायण यांचा पराभव केला. हरिनारायण हे काँग्रेस पक्षाचे हनुमान मंडळाचे अध्यक्ष होते. मतमोजणी संपताच त्यांचा 14 मतांनी पराभव झाल्याचे वृत्त आले आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

अनेक ठिकाणी भाजपचा विजय
मध्य प्रदेशातील शहरी विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. भाजपने सतना, बुरहानपूर आणि खांडवा येथे निवडणुका जिंकल्या आहेत. जबलपूर, छिंदवाडा आणि ग्वाल्हेरमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. सिंगरौलीमध्ये आम आदमी पक्ष आघाडीवर आहे. इंदूर, भोपाळ आणि सागरमध्ये भाजप आघाडीवर आहे.

बुरहानपूरचे नगराध्यक्षपद भाजपच्या गोटात
मध्य प्रदेशातील बुरहानपूर शहरातून महापौरपदासाठी भाजपच्या उमेदवार माधुरी पटेल 542 मतांनी विजयी झाल्या आहेत. पटेल यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी आणि काँग्रेस उमेदवार शहनाज अन्सारी यांचा 542 मतांनी पराभव केला. पटेल यांना 52,823 तर अन्सारी यांना 52,281 मते मिळाली.

Web Title: Madhya Pradesh rewa news; Congress candidate Harinaraya Gupta died after losing in municipal carporation eletion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.