मै निकला, ओ... राहुल गांधींचा ट्रकमधून प्रवास, ड्रायव्हरशी संवाद; व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 09:53 AM2023-05-23T09:53:04+5:302023-05-23T09:53:20+5:30
राहुल गांधी हे दिल्लीहून शिमलासाठी रवाना झाले आहेत. या प्रवासादरम्यान अंबाला ते चंदीगड मार्गावर त्यांनी चक्क ट्रकने प्रवास केला
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा साधेपणा आणि सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळण्याचा स्थायीभाव पाहून अनेकजण भारावून गेले होते. भारत जोडो यात्रेत त्यांचे अनेक फोटो व्हायरल झाले. ज्यामध्ये राहुल गांधी कधी धावताना दिसले, कधी रस्त्यावर चहा पिताना दिसले, कधी दुचाकीवरुन जाताना दिसले तर कधी वयोवृद्धांसोबत गप्पा मारताना दिसले. दोन दिवसांपूर्वी कर्नाटक सरकारच्या शपथविधी सोहळ्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी जाहीर केलेल्या ५ योजना लागू करत असल्याचं सांगितलं. कर्नाटक विजयाचा आनंद व्यक्त केल्यानंतर आता राहुल गांधी चक्क ट्रकमधून प्रवास करताना दिसून आले.
राहुल गांधी हे दिल्लीहून शिमलासाठी रवाना झाले आहेत. या प्रवासादरम्यान अंबाला ते चंदीगड मार्गावर त्यांनी चक्क ट्रकने प्रवास केला. काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राहुल गांधींचा ट्रकमधील हा व्हिडिओ शेअर केला आहे. या ट्रकमधील प्रवासादरम्यान राहुल गांधींनी ट्रकचालक, ड्रायव्हर यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच, रस्तेप्रवासात येणाऱ्या अडचणींवरही चर्चा केली. राहुल गांधींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
यूनिवर्सिटी के छात्रों से
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) May 23, 2023
खिलाड़ियों से
सिविल सर्विस की तैयारी कर रहे युवाओं से
किसानों से
डिलीवरी पार्टनरों से
बस में आम नागरिकों से
और अब आधी रात को ट्रक के ड्राइवर से
आख़िर क्यों मुलाक़ात कर रहे हैं राहुल गांधी?
क्योंकि वो इस देश लोगों की बात सुनना चाहते हैं,… pic.twitter.com/HBxavsUv4f
काँग्रेस नेते सुप्रिया श्रीनेत यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. तसेच, यूनिवर्सिटीतील विद्यार्थी, खेळाडू, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे तरुण, शेतकरी, डिलीव्हरी बॉय, बसमध्ये सर्वसामा्य नागरिक आणि आता ट्रकमधील ड्रायव्हर यांच्यासोबत का प्रवास करत असतील राहुल गांधी?. कारण, ते देशातील लोकांच्या मनातील गोष्ट ऐकू इच्छित आहेत. राहुल गांधींना असं करताना पाहून एक विश्वास वाटतो, कोणी तरी आहे, जो लोकांसमवेत उभा आहे. कोणीतरी आहे, जो लोकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कुर्बाणी देण्यासाठी तयार आहे. कोणीतरी आहे, जो तिरस्काराच्या बाजारात प्रेमाचं दुकान चालवत आहे, असे ट्विट श्रीनेत यांनी केलं आहे.