काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल, गुलाब नबी आझाद यांना महासचिव पदावरून हटवले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 09:53 PM2020-09-11T21:53:57+5:302020-09-11T22:04:30+5:30
काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांना महासचिव पदावरून हटविण्यात आले आहे. ते हरयाणा राज्याचे प्रभारी होते.
नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांना महासचिव पदावरून हटविण्यात आले आहे. ते हरयाणा राज्याचे प्रभारी होते.
शुक्रवारी करण्यात आलेल्या संघटनात्मक फेरबदलामध्ये सर्वात मोठा फायदा काँग्रेसचे नेते राहुल गांधींचे निष्ठावंत रणदीपसिंह सुरजेवाला यांना झाला आहे. रणदीपसिंह सुरजेवाला यांचा आता काँग्रेस अध्यक्षांना सल्ला देणाऱ्या उच्च स्तरीय सहा सदस्यांच्या विशेष समितीमध्ये सहभाग असणार आहे. याशिवाय, रणदीपसिंह सुरजेवाला यांना काँग्रेसचे महासचिवपदी नियुक्ती केली आहे. त्यांना कर्नाटकचे प्रभारी करण्यात आले आहे. सहा सदस्यांच्या विशेष समितीमध्ये ए के अँटोनी, अहमद पटेल, अंबिका सोनी, केसी वेणुगोपाल, मुकुल वासनिक आणि रणदीप सुरजेवाला यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, गुलाब नबी आझाद, अंबिका सोनी, मोतीलाल वोरा, मल्लिकार्जुन खर्गे यांना महासचिव पदावरून हटवले आहे. सगळ्यात महत्त्वाचे महाराष्ट्र प्रभारी बदलले आहेत. मल्लिकार्जुन खर्गे यांच्याऐवजी एच के पाटील आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी असणार आहेत. मल्लिकार्जुन खर्गे यांची महाराष्ट्रातून उचलबांगडी करण्यात आली आहे. मुकुल वासनिक यांच्याकडे आधी चार राज्यांचा प्रभार होता. त्यामधील तीन काढून घेण्यात आले असून एक कायम ठेवला आहे.
मधुसूदन मिस्त्री यांची केंद्रीय निवडणूक समितीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेशच्या प्रभारी करण्यात आले आहे. याशिवाय, केसी वेणुगोपाल यांच्याकडे संघटनेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस महासचिवांमध्ये मुकुल वासनिक यांना मध्य प्रदेशची, हरीश रावत यांना पंजाबची, ओमान चांडी यांना आंध्र प्रदेशची, तारिक अन्वर यांना केरळ आणि लक्षद्वीपची, जितेंद्र सिंह यांना आसामची आणि अजय माकन यांना राजस्थानची जबाबदारी देण्यात आली आहे.
याचबरोबर, जितिन प्रसाद यांना पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार बेटांच्या काँग्रेसचे प्रभारी करण्यात आले आहे. जितिन प्रसाद यांच्यासाठी संघटनेतील एक मोठी झेप असल्याचे मानले जाते. विशेष म्हणजे, जितिन प्रसाद हे वादग्रस्त पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या नेत्यांपैकी एक होते. तसेच, सध्याच्या संघटनेतील बदलानंतर पवनकुमार बन्सल हे प्रभारी प्रशासन सचिव असतील. याशिवाय राहुल गांधी यांचे निष्ठावंत मानकीम टागोर यांची तेलंगणाच्या प्रभारी सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
AICC General Secretaries as appointed by Congress President Smt. Sonia Gandhi. pic.twitter.com/MyLVgg6ukU
— Congress (@INCIndia) September 11, 2020
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी देशभरातील काँग्रेसच्या २० हून अधिक वरिष्ठ नेत्यांनी पक्षात मोठ्या बदलांची गरज असल्याचे मत त्यांनी पत्रातून व्यक्त केले होते. या नेत्यांनी पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष गरजेचा असल्याची महत्त्वाची मागणी सोनिया गांधी यांच्याकडे केली होती. यामध्ये गुलाब नबी आझाद यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांचा समावेश होता. त्यामुळे पक्षात वाद निर्माण झाला होता. मात्र, यानंतर झालेल्या काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत सोनिया गांधी यांची पुन्हा पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली.
आणखी बातम्या...
- Zomato देणार गुंतवणूकदारांना पैसे कमविण्याची संधी, पुढील वर्षात IPO ची शक्यता
- Apple सुद्धा आणणार फोल्डेबल स्मार्टफोन? सॅमसंगचा डिस्प्ले वापरणार - रिपोर्ट
- मराठा आरक्षण : राज्य सरकार सोमवारी सरन्यायाधीशांकडे अर्ज करणार - अशोक चव्हाण
- कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई सूड बुद्धीने, आशिष शेलारांचा पालिकेसह सरकारवर हल्लाबोल
- महाविकास आघाडीला मराठा समाज माफ करणार नाही, विनायक मेटेंची टीका
- "जलयुक्त शिवारमध्ये १० हजार कोटी रुपये बुडवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा"
- सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये निघाली भरती