मिशन २०२४: काँग्रेसने कर्नाटकात वापरलेला फॉर्म्युला, उत्तर भारतात ठरणार गेम चेंजर?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 05:02 PM2023-05-15T17:02:41+5:302023-05-15T17:34:52+5:30

कर्नाटकातील विजयानंतर काँग्रेसने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडवर आपले लक्ष वळवले आहे.

Mission 2024: Formula used by Congress in Karnataka, a game changer in North India? | मिशन २०२४: काँग्रेसने कर्नाटकात वापरलेला फॉर्म्युला, उत्तर भारतात ठरणार गेम चेंजर?

मिशन २०२४: काँग्रेसने कर्नाटकात वापरलेला फॉर्म्युला, उत्तर भारतात ठरणार गेम चेंजर?

googlenewsNext


Congress Karnataka: भाजपच्या कार्यशैलितून धडा घेत काँग्रेसने कर्नाटकातील दणदणीत विजयानंतर लगेचच मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यातील निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. 2014 नंतर भाजपमध्ये एक कार्यशैली विकसित झाली आहे, ज्या अंतर्गत कोणत्याही राज्याचे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच पक्ष इतर राज्यांवर लक्ष केंद्रित करू लागतो. 2014-2020 पर्यंत या कार्यशैलीनुसार पंतप्रधान मोदींसह अमित शहांनी उत्कृष्ट परिणाम दिले आहेत. या अंतर्गत पक्ष किमान सहा महिने अगोदर निवडणुकीची तयारी सुरू करतो.

कर्नाटकच्या धर्तीवर प्रचार होईल
या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या राजस्थान आणि छत्तीसगड निवडणुकीत सत्ता टिकवण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे, तर मध्य प्रदेश पुन्हा काबीज करण्याचेही पक्षाने लक्ष्य ठेवले आहे. मध्य प्रदेशात, 2018 मध्ये ते जिंकले परंतु 2020 मध्ये ज्योतिरादित्य सिंधिया गटातील 22 आमदारांनी पक्षांतर केल्यामुळे कमलनाथ सरकार कोसळले.

2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाने 'कर्नाटक टेम्प्लेट'च्या धर्तीवर प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसाठी काँग्रेसने आखलेल्या योजनेत स्थानिक रणनीती, सकारात्मक प्रचार, मोफत भेटवस्तू, तिकिटांचे लवकर वाटप आणि काँग्रेसच्या विचारधारेवर भर, या प्रमुख वैशिष्ट्यांचा समावेश आहे. याच वैशिष्ट्यांच्या बळावर काँग्रेस कर्नाटक निवडणुकीतही उतरली होती.

पक्ष बॅक टू बेसिक्सवर येणार 
काँग्रेस 'बॅक टू बेसिक्स' या उद्देशाकडे परतत असल्याचे दिसत आहे. विजयानंतर लगेचच सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांनी सिद्धरामय्या, डीके शिवकुमार, मल्लिकार्जुन खर्गे, रणदीप सिंग सुरजेवाला आणि इतरांसोबतचे फोटो शेअर करणे टाळले. नवनिर्वाचित आमदारांनी नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांना नव्हे तर काँग्रेस अध्यक्षांना अधिकार दिले. वरवर लहान वाटणार्‍या घटनेला मोठे महत्त्व आहे, कारण पूर्वी सोनिया गांधींना संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये नेते निवडण्याचे अधिकार देण्यात आले होते.

Web Title: Mission 2024: Formula used by Congress in Karnataka, a game changer in North India?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.