मोदी भांडवलदार मित्रांचे ऐकतात, भांडवलदारांच्या कर्जमाफीवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 02:32 AM2021-01-19T02:32:48+5:302021-01-19T06:58:37+5:30
शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या मागण्यांबद्दल व त्यांच्या कर्जमाफीवर मोदी पूर्णपणे असंवेदनशील आहेत कारण ते फक्त भांडवलदारांचे ऐकतात. शेतकरी, बेरोज़गार आणि सामान्य लोकांशी त्यांचा काही संबंध नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : अदानी, अंबानी यासारख्या भांडवलदार मित्रांना ८,७५,००० कोटी रुपयांची कर्जमाफी केल्याच्या मुद्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्ला करून मोदी “आपल्या सूटबूटवाल्या मित्रांचे ८,७५,००० कोटी रुपयांचे क़र्ज़ माफ करून इतर दात्यांचा पैसा साफ़ करीत आहेत व ते फक्त भांडवलदार मित्रांचेच ऐकतात असा आरोप केला.
राहुल गांधी यांनी २०१४ पासून २०१९ पर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ़ इंडियाचे आकडेही दिले. त्यानुसार २०१४ मध्ये ६० हजार कोटी, २०१५ मध्ये ७२.५ हजार कोटी, २०१६ मध्ये १०७ हजार कोटी, २०१७ मध्ये १,०६२.३ हजार कोटी, २०१८ मध्ये २३६.३ हजार कोटी आणि २०१९ मध्ये २३७.२ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले गेले
आहे.