Rafale Deal: राफेलवरून मोदींच्या मंत्र्यांमध्ये अद्यापही गोंधळ; सीतारामन-प्रसाद यांची परस्पर विरोधी वक्तव्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 01:29 PM2018-10-25T13:29:46+5:302018-10-25T13:32:34+5:30
संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज डसॉल्टने रिलायन्सची निवड का व कशी केली, की आणखी किती भागिदार आहेत हे डसाल्टलाच माहीत असे सांगितले.
मुंबई : राफेल खरेदीवरून कथित घोटाळ्यासंदर्भात मोदी सरकारची बाजू मांडताना भाजपच्याच दोन केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्यांवरून अद्यापही गोंधळाची स्थिती असल्याचे दिसत आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज डसॉल्टने रिलायन्सची निवड का व कशी केली, की आणखी किती भागिदार आहेत हे डसाल्टलाच माहीत असे सांगितले. तर काही दिवसांपूर्वी माहिती आणि प्रसारण मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी रिलायन्स एकटीच नसून इतर कंपन्यांच्या नावांसह आकडेही जाहीर करून टाकले होते.
सीतारामन आज मुंबईमध्ये इंडिया समिटसाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी डसॉल्टने रिलायन्सला निवडले की नाही, की फक्त रिलायन्सची निवड केली, की आणखी किती भागिदार आहेत हे डसॉल्टलाच माहीत असल्याचे सांगत हात झटकले. याबरोबरच त्यांनी डसॉल्टने अद्याप संरक्षण मंत्रालयालाही याबाबत काही कळविले नसल्याचे सांगितल्याने भाजपचे वरिष्ठ मंत्रीच संभ्रमात असल्याचे स्पष्ट होत आहे.
या उलट काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पाकिस्तानला मदत करत असल्याचा आरोप करत असताना माहिती आणि प्रसारण मंत्री रवीशंकर प्रसाद 22 सप्टेंबरला देशातील केवळ रिलायन्सच नाही, तर महिंद्रासह सहा कंपन्यांशी करार झाले आहेत. विमानासाठी लागणारे सुटे भाग याच कंपन्या बनविणार आहेत. याचबरोबर अन्य 100 कंपन्यांशीही बोलणी सुरु आहेत, अशी माहिती दिली होती.
Wo ye keh rahe hain bata do iska daam kitna hai,taaki dushman chaukanne ho jaayein.He wants to help Pakistan. It's my charge with full sense of responsibility,R Gandhi is playing in hands of enemies of India by insisting upon disclosure of all weapon system: RS Prasad #RafaleDealpic.twitter.com/1dUZBQOKgR
— ANI (@ANI) September 22, 2018
रवीशंकर प्रसाद यांनी दिलेली माहिती आणि सितारामन यांचे आजचे संरक्षण मंत्रालयाला काहीच माहीती नसल्याचे वक्तव्यावरून मोदी सरकारच्याच मंत्र्यांमध्ये गोंधळाची स्थिती असल्याचे दिसून येत आहे. रवीशंकर यांनी भागिदार कंपन्यांच्या नावासह आकडेवारी दिलेली असताना सीतारामन काही माहितीच नसल्याचे सांगत आहेत.