"राहुल गांधींनी नाक घासून माफी मागावी; आम्ही हिंदू आहोत हे अभिमानाने सांगा, मी..."
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 09:13 AM2024-07-02T09:13:44+5:302024-07-02T09:16:38+5:30
Mohan Yadav And Congress Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्या विधानाने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पक्षाचे नेते काँग्रेसच्या नेत्यांवर सातत्याने निशाणा साधत आहेत. याच दरम्यान, त्यांच्या विधानावर आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विधानाने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पक्षाचे नेते काँग्रेसच्या नेत्यांवर सातत्याने निशाणा साधत आहेत. याच दरम्यान, त्यांच्या विधानावर आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राहुल गांधींनी तातडीने नाक घासून माफी मागावी, असं म्हटलं आहे.
मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की, "राहुल गांधी यांच्या विधानाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या मंदिराच्या आतमध्ये विरोधी पक्षनेत्याने हिंदू समाजाला लाजवेल असं विधान केलं आहे. हिंदूंना हिंसक म्हणणाऱ्या त्यांच्या मानसिकतेचं हे प्रतिबिंब आहे."
गर्व से कहो हम हिन्दू हैं... pic.twitter.com/V7Ih2byLe4
— Dr Mohan Yadav (@DrMohanYadav51) July 1, 2024
"संपूर्ण जगात भारत हा एकमेव देश आहे जिथे हिंदू एवढ्या मोठ्या संख्येने आहेत आणि विरोधी पक्षाच्या नेत्याने असं विधान केलं तर हिंदू ते कसं सहन करतील. यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नाक घासून माफी मागावी."
"आम्ही हिंदू आहोत हे अभिमानाने सांगा. मी हिंदू आहे हे मी अभिमानाने सांगतो. राहुल गांधींच्या या विधानामुळे सर्वांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्यांनी तात्काळ माफी मागावी. मी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना आवाहन करणार आहे. त्यांचा राजीनामा मागा, तसेच राहुल गांधींच्या विधानाशी पक्ष सहमत आहे की नाही, हे काँग्रेसने स्पष्ट करावे."
राहुल गांधी यांनी भाजपावर आरोप केला की, भारतीय जनता पक्ष देशात हिंसा, द्वेष आणि भीती पसरवत आहे. हे लोक हिंदू नाहीत, कारण ते 24 तास हिंसाचारावर बोलतात, असा दावाही केला. राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेत भाग घेताना असंही सांगितलं की, हिंदू कधीही हिंसा करू शकत नाही, द्वेष आणि भीती कधीही पसरवू शकत नाही.