ग्वाल्हेरनंतर भाजपाने आणखी तीन नगरपालिका गमावल्या; मध्य प्रदेशमध्ये आले नाकीनऊ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 03:44 PM2022-07-20T15:44:42+5:302022-07-20T15:45:38+5:30

MP Civic Poll Election Result: ग्वाल्हेरनंतर भाजपासाठी मुरैनाची नगरपालिका महत्वाची होती. वर्षभरात मध्य प्रदेशमध्ये निवडणुका आहेत. यामुळे भाजपाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

MP Civic Poll Election Result: After Gwalior, BJP lost three more municipalities in Madhya Pradesh | ग्वाल्हेरनंतर भाजपाने आणखी तीन नगरपालिका गमावल्या; मध्य प्रदेशमध्ये आले नाकीनऊ

ग्वाल्हेरनंतर भाजपाने आणखी तीन नगरपालिका गमावल्या; मध्य प्रदेशमध्ये आले नाकीनऊ

Next

मध्य प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यातील ११ पैकी चार महापालिका गमावणाऱ्या भाजपाला दुसऱ्या टप्प्यातदेखील मोठा धक्का बसला आहे. भाजपाने आणखी तीन नगर पालिका हातच्या गमावल्या आहेत. ओबीसी आरक्षणानंतर या निवडणुका झाल्या आहेत. 

दुसऱ्या टप्प्यात मुरैना, रीवा आणि कटनी या तीन नगरपालिका भाजपाने गमावल्या आहेत. या दोन ठिकाणी काँग्रेस तर एका ठिकाणी अपक्षांची सत्ता आली आहे. ग्वाल्हेरनंतर भाजपासाठी मुरैनाची नगरपालिका महत्वाची होती. कारण केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या मतदार संघातील ही महत्वाची पालिका होती. ग्वाल्हेर ही ज्योतिरादित्य शिंदेंची महापालिका होती. मुरैनामध्ये ४७ वार्डांपैकी १९ वर काँग्रेस, १५ वर भाजपा आणि आठ वर बसपा जिंकली आहे. तीन अपक्ष तर एका जागेवर आपचा उमेदवार जिंकला आहे. 

मध्य प्रदेशमध्ये महापौरांची निवडणूक ही थेट केली जाते. जनता थेट महापौर निवडते.  राज्यात १६ पालिकांच्या निवडणुका झाल्या. यामध्ये सात नगरपालिका भाजपाने गमावल्या आहेत. या सर्व पालिकांवर भाजपाची अनेक वर्षे सत्ता होती. ग्लाल्हेर, जबलपूर, छिंदवाडा, रीवा, मुरैना, कटनी आणि सिंगरौली या पालिका भाजपाने गमावल्या आहेत. पाच पालिका या काँग्रेसने जिंकल्या आहेत. 
मध्य प्रदेशमध्ये वर्षभरानंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. यामुळे भाजपाला चिंतेत टाकणारी तर काँग्रेसला बळ देणारी ही निवडणूक ठरली आहे. भाजपाच्या ताब्यात इंदौर, भोपाळ, बुरहानपुर, उज्जैन, सतना, खंडवा आणि सागर या महापालिका गेल्या आहेत. ग्वाल्हेरमध्ये ५७ वर्षांनी भाजपाची सत्ता गेली आहे. जबलपूरमध्ये २३ वर्षांनी भाजपाचा महापौर नसणार आहे. 

ग्वाल्हेर का बोचणारे...
ग्वाल्हेरमधून दोन केंद्रीय मंत्री, राज्य सरकारचे पाच मंत्री येतात. एवढी सत्ता एकवटलेली असतानाही ग्वाल्हेर गमावल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे. शहरी मतदारांवर भाजपाचा मोठा पगडा आहे, असे असले तरी देखील काँग्रेसचा उमेदवार जिंकल्याने आश्चर्य व्य़क्त केले जात आहे. ग्वाल्हेरच्या विजयाचे श्रेय सतीश सिकरवार यांना दिले जात आहे. त्यांची पत्नी शोभा शर्मा यांनी भाजपाच्या सुमन शर्मा यांचा पराभव केला. शर्मा या नरेंद्र सिंह तोमर यांच्या समर्थक होत्या. तर ज्योतिरादित्यांना माया सिंह यांना निवडणुकीत उतरवायचे होते. परंतू, तोमर यांनी राजकारण करून शिंदेंचा पत्ता कट केला आणि पक्षाला सुमन शर्मा यांना उतरविण्यास भाग पाडले. 

Web Title: MP Civic Poll Election Result: After Gwalior, BJP lost three more municipalities in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.