खासदारकी येताच राहुल गांधींना पुन्हा ‘ती’ जबाबदारी; संरक्षणविषयक समितीचे सदस्यत्व बहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 06:19 AM2023-08-17T06:19:10+5:302023-08-17T06:20:26+5:30

संरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

mp rahul gandhi gets responsibility membership of the committee on defense was conferred | खासदारकी येताच राहुल गांधींना पुन्हा ‘ती’ जबाबदारी; संरक्षणविषयक समितीचे सदस्यत्व बहाल

खासदारकी येताच राहुल गांधींना पुन्हा ‘ती’ जबाबदारी; संरक्षणविषयक समितीचे सदस्यत्व बहाल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना लोकसभेचे सदस्यत्व बहाल केल्यानंतर बुधवारी त्यांची संरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

काँग्रेस खासदार अमर सिंह यांनाही समितीचे सदस्य बनवण्यात आले आहे. आम आदमी पक्षाचे नवनिर्वाचित लोकसभा सदस्य सुशील कुमार रिंकू यांची कृषी, पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया समितीवर निवड करण्यात आली आहे. त्यांनी अलीकडेच 
जालंधर लोकसभा पोटनिवडणूक जिंकली आणि संसदेच्या कनिष्ठ सभागृहात ते एकमेव आप सदस्य आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पी.पी. मोहम्मद फैजल यांची ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. यावर्षी मार्चमध्ये अपात्र ठरविण्याच्या पूर्वीपर्यंत राहुल गांधी संरक्षणविषयक स्थायी समितीचे सदस्य होते.


 

Web Title: mp rahul gandhi gets responsibility membership of the committee on defense was conferred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.