राहुल गांधी आता पप्पू नाही, गप्पू बनलेत- मुख्तार अब्बास नक्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 03:19 PM2018-12-22T15:19:42+5:302018-12-22T15:26:29+5:30
केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. ' राहुल गांधी आता पप्पू राहिले नाहीत. ते आता गप्पू झाले आहेत'.
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. ' राहुल गांधी आता पप्पू राहिले नाहीत. ते आता गप्पू झाले आहेत. त्यांनी बरोबर म्हटले होते की आता ते पप्पू राहिले नाहीत. आता ते पप्पूहून गप्पू झाले आहेत आणि पप्पूपासून ते गप्पूपर्यंतचा त्यांचा प्रवास खोटे बोलण्याच्या आधारे सुरू झाला आहे, तर ते बरोबर बोलत आहेत', अशी प्रतिक्रिया मुख्तार अब्बास नक्वी दिली आहे.
(राहुलजींचे नेतृत्व परिपक्व होतेय!)
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. पाचपैकी तीन राज्यांमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्ता काबीज केली. यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्व कौशल्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. राहुल गांधींचे जाहीर कौतुक होऊ लागले आहे.
(पप्पूंनी आता लग्न करुन पप्पा बनावं, रामदास आठवलेंचा राहुल गांधींना सल्ला)
Union Minister M A Naqvi on Farooq Abdullah's reported comment 'Rahul Gandhi no longer a Pappu': Unhone sahi kaha ki vo ab pappu nahi rahe hain. Ab vo pappu se gappu ban gaye hain, aur pappu se lekar gappu ka unka safar jhuth ka jhunjhuna lekar hua hai, to vo thik keh rahe hain. pic.twitter.com/u10brpMafq
— ANI (@ANI) December 22, 2018
राहुल गांधी आता पप्पू राहिले नाहीत, असे लोक बोलू लागली आहेत. यावरुनच पलटवार करताना नक्वी यांनी म्हटले की, राहुल गांधी पप्पूहून आता गप्पू झाले आहेत.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसनं मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये सत्ता स्थापन केली आहे. या तीन राज्यांत काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर राहुल गांधींच्या नेतृत्व कौशल्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बराच बदलला आहे. तीन राज्यांमध्ये भाजपाला पराभवाचा धक्का बसल्यानंतर, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं बाजी मारल्यानंतर, पप्पू आता परमपूज्य झालेत, अशी मार्मिक टिप्पणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती.