नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 06:08 PM2024-09-25T18:08:09+5:302024-09-25T18:09:10+5:30

नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या यू-टर्नवरुन राहुल गांधींची बोचरी टीका

Narendra Modi has to apologize again; Rahul Gandhi criticizes Kangana Ranaut's U-turn | नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका

नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका

Rahul Gandhi On Kangana Ranaut: भारतीय जनता पक्षाच्या खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राजकारण तापले आहे. भाजप पुन्हा शेतकरीविरोधी तिन्ही काळे कायदे आणणार असल्याचा आरोप काँग्रेस सातत्याने करत आहे. दरम्यान, यावर आता काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट प्रश्न विचारला आहे. 

'पंतप्रधान मोदींना माफी मागावी लागेल'
भाजपवर आरोप करताना काँग्रेस राहुल गांधी म्हणाले की, "700 हून अधिक शेतकरी, विशेषत: हरियाणा आणि पंजाबमधील शेतकरी शहीद झाले. तरीदेखील भाजपचे लोक समाधानी नाहीत. इंडिया आघाडी देशाच्या अन्नदात्यांविरोधातील भाजपचा एकही कट यशस्वी होऊ देणार नाही. शेतकऱ्यांचे नुकसान करणारे कोणतेही पाऊल उचलले गेले, तर नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल," असे राहुल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

कंगना रणौतने काय म्हटले?
भाजप खासदार कंगना रणौत यांनी तीन कृषी कायदे परत आणले पाहिजेत आणि शेतकऱ्यांनी स्वतःच त्याची मागणी करावी, असे म्हटले होते. विशेष म्हणजे, या विधानाला भाजपच्या मित्र पक्षानेही विरोध केला. यामुळे अखेर कंगनाला आपले वक्तव्य मागे घ्यावे लागले. हे माझे वैयक्तिक विधान आहे, पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नाही, असे कंगनाने म्हटले. दरम्यान, हरियाणामध्ये पुढील महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. राज्यात शेतकऱ्यांचा मुद्दा प्रमुख आहे, त्यामुळे भाजपला कुठलाही धोका पत्करायचा नाही.

 

Web Title: Narendra Modi has to apologize again; Rahul Gandhi criticizes Kangana Ranaut's U-turn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.