मोदी दीड तास बोलले, पण काँग्रेसवरच घसरले; 'काम की बात' नाहीच: राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2018 02:28 PM2018-02-07T14:28:31+5:302018-02-07T15:47:03+5:30
आम्ही पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकायला उत्सुक होतो.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत तब्बल दीड तास भाषण केले. पण यापैकी एकही गोष्ट कामाची नव्हती, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. राहुल यांनी म्हटले की, आज लोकसभेत आम्ही पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकायला उत्सुक होतो. मात्र, त्यांचे भाषण केवळ राजकीय आणि प्रचारसभेच्या धाटणीचे होते, असे राहुल गांधी यांनी म्हटले.
आम्ही मोदींना राफेल विमान खरेदी व्यवहार, शेतकऱ्यांच्या समस्या आणि रोजगारनिर्मिती अशा तीन मुद्द्यांवर प्रश्न विचारले होते. मात्र, दीड तासांच्या भाषणात मोदी यावर एकही शब्द बोलले नाहीत. या मुद्द्यांवर बोलायचे सोडून ते मधुमक्षिकापालन आणि बांबू अशा गोष्टींविषयी बोलत राहिले. त्यांनी आपला सर्व वेळ काँग्रेस नेत्यांवर टीका करण्यातच घालवला. मात्र, आमच्या साध्या आणि सोप्या प्रश्नांची उत्तरे ते देऊ शकले नाहीत. सत्तेवर येण्यापूर्वी पंतप्रधान मोदी भ्रष्टाचारमुक्त कारभाराची भाषा बोलायचे. आता राफेल व्यवहारात भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घालत आहेत. 2014 पूर्वी सत्तेत येण्याच्या अगोदर ते काँग्रेसच्या 70 वर्षांचा हिशेब मांडायचे ती गोष्ट ठीक होती. मात्र, आता सत्तेत येऊन इतका काळ उलटल्यानंतरही मोदी त्याच त्या गोष्टी सांगत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.
I think Modiji has forgotten that he is the PM now, he should answer questions and not always accuse the opposition : Rahul Gandhi pic.twitter.com/UuaIXBZQGX
— ANI (@ANI) February 7, 2018
He spoke for more than 1 hour but didn't speak a word on Rafale deal, or on farmers or on employment for youth. It was a totally political speech : Rahul Gandhi on PM's speech in Lok Sabha pic.twitter.com/GeX9EhkEmT
— ANI (@ANI) February 7, 2018
घराणेशाही करणाऱ्यांनी लोकशाहीबद्दल बोलू नये, लोकसभेत मोदींची काँग्रेसवर सडकून टीका
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण सुरु आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत उत्तर देत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसला खडे बोल सुनावत आहेत. विरोधक टीका करताना तीच कॅसेट पुन्हा पुन्हा चालवतात असा टोला नरेंद्र मोदींनी लगावला आहे. तुमच्याकडे इतका वेळ होता, पण फक्त एका कुटुंबांच गुणगान गाण्यात सर्व शक्ती घालवली, अशीही टीका त्यांनी केली आहे.
'तुम्ही भारताचे तुकडे केलेत, तरीही देशातील जनता तुमच्यासोबत राहली. देशावर तुम्ही राज्य करत होतात. विरोधी पक्ष जणू अस्तित्वातच नव्हता. काँग्रेसनं इतकी वर्ष एकाच कुटुंबाचं गुणगान गायलं. देशाने एकाच कुटुंबाला ओळखावं यासाठी सगळी शक्ती पणाला लावली. तुमची वृत्ती चांगली असती तर हा देश कितीतरी पुढे गेला असता', असं नरेंद्र मोदी बोलले आहेत.
दरम्यान विरोधकांचा गरादोळ सुरुच असून झुटा भाषण बंद करो, झुटे आश्वासन बंद करो, अशी घोषणाबाजी विरोधक करत आहेत. क्या हुआा, क्या हुआ, 15 लाख का क्या हुआ? अशाही घोषणा यावेळी दिल्या जात आहेत.
'देशाला लोकशाही काँग्रेसनं किंवा नेहरुंनी दिलेली नाही. लोकशाही ही आमच्या रक्तात आहे, आणची परंपरा आहे. तुम्ही लोकशाहीच्या गप्पा मारता? तुमचे पंतप्रधान राजीव गांधींनी हैदराबाद विमानतळावर आपल्याच पक्षाच्या दलित मुख्यमंत्र्यांना सर्वांसमोर अपमानित केलं होतं', ही आठवण नरेंद्र मोदींनी काँग्रेसला करुन दिली.
'आम्हाला तुम्ही लोकशाही शिकवू नका. तुम्हाला ते शोभून दिसत नाही. सरदार वल्लभभाई पटेल जर देशाचे पहिले पंतप्रधान असते, त संपूर्ण काश्मीर आपलं असतं. आपल्यानंतर स्वातंत्र्य झालेल्या अनेक देशांनी प्रगती केली आहे हे मान्य करा', असं नरेंद्र मोदी बोललेत.
'आवाज दाबण्याचा जो प्रयत्न होतोय, तो यशस्वी होणार नाही याची मला खात्री आहे. काँग्रेसने पसरवलेल्या विषाची किंमत सर्व देशवासीयांना चुकवावी लागतेय. आज हा देश ज्या ठिकाणी आहे, त्यात आजवरच्या सर्व सरकारांचं योगदान असल्याचं मी लाल किल्ल्यावरून म्हटलं. हे सौजन्य काँग्रेसच्या एकाही नेत्यानं दाखवलं नाही', असा टोला मोदींनी लगावला.
'२०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर आम्ही ईशान्य भारतावर लक्ष केंद्रीत केलं आणि तिथे विकासाची कामं केली. तुम्ही डोळे बंद करुन ठेवलेत, फक्त आपलं गुणगान गाण्यात व्यस्त आहात. 80 च्या दशतकात 21 व्या दशकाचं स्वप्न दाखवलं जात होतं पण साधी एव्हिएशन पॉलिसी तुम्ही आणू शकला नाहीत', अशी टीका मोदींनी केली.
'ही योजना आमची होती, ही कल्पना आमची होती, असं हे म्हणतात. पण तुमची काम करण्याची पद्धत काय होती? जोपर्यंत नातेवाईंची जुळवाजुळव होत नाही, गाडी पुढे जाणार नाही. केरळमध्ये काँग्रेस कसा वागला?, पंजाबमध्ये त्यांनी अकाली दलाला कशी वागणूक दिली?, तामिळनाडूत ते कसे वागले? ही लोकशाहीबद्दलची कटिबद्धता नव्हती', असे अनेक प्रश्न मोदींनी विचारले. नरेंद्र मोदी आधार पुढे येऊन देणार नाही अशी टीका होत होती. पण जेव्हा ते लागू करण्यात आलं तेव्हा त्याच्या प्रक्रियेवर टीका करु लागले', असं मोदींनी म्हटलं.