नरेंद्र मोदी vs राहुल गांधी... लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कसा केला दोघांनी प्रचार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 01:31 PM2024-06-01T13:31:04+5:302024-06-01T13:31:47+5:30
नरेंद्र मोदींनी सर्वाधिक २०६ रॅली केल्या, तर राहुल गांधींनी १०७ रॅलीतून आपला मुद्दा जनतेपर्यंत पोहोचवला.
लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली: भाजप व काँग्रेस नेत्यांनी निवडणुकीदरम्यान रात्रीचा दिवस करून मेहनत घेतली. भाजपकडून नरेंद्र मोदींकडून सर्वाधिक २०६ रॅली आणि रोड, तर राहुल गांधींनी १०७ रॅलीत रोड शो आणि सभांतून आपला मुद्दा जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. मोदींनी प्रचारात प्रत्येक टप्प्यात विविध मुद्दे उपस्थित करत विरोधकांना हैराण केले, तर राहुल गांधी यांचा प्रचार संविधानाचे संरक्षण आणि पाच घोषणाभोवती केंद्रित राहिला.
नरेंद्र मोदी - दरवेळी नवा मुद्दा
- नरेंद्र मोदींच्या रॅली, सभा
उत्तर प्रदेश ३१, बिहार २०, महाराष्ट्र १९, बंगाल १८, ओडिशा १०, मध्य प्रदेश १०, गुजरात ५, पंजाब ४, हरयाणा ३, हिमाचल २, दिल्ली २, उत्तराखंड २, जम्मू-काश्मीर १, पूर्वोत्तर २
नरेंद्र मोदींनी केलेली प्रमुख वक्तव्ये
- विरोधक सनातन संपवतील
- इंडिया आघाडीची मंगळसूत्रावर नजर
- काँग्रेस मुस्लिमांना आरक्षण देईल
- काँग्रेस रामलल्लाला पुन्हा तंबूत पाठवेल
- इंडिया आघाडी जिंकल्यास प्रत्येक वर्षी पंतप्रधान बदलेल
- ते हिंदूंना भगीरथी नदीत बुडवतील
- विरोधकांना आपल्या पिचवर खेळविले
१९ एप्रिलपर्यंत मोदींनी आक्रमक टीका केली नाही. मात्र दुसऱ्या टप्प्यापासून त्यांनी कठोर वक्तव्ये करण्यास सुरुवात केली. महिलांचे मंगळसूत्र ते मुस्लीमांना धर्माच्या आधारावर आरक्षण या वक्तव्यांमुळे मोदींनी विरोधकांना आपल्यावर पिचवर फसविण्याचा प्रयत्न केला.
- ३६० डिग्रीमध्ये फिरले मोदी
मोदींनी गुरुवारी पंजाबमध्ये शेवटची सभा घेत ध्यान करण्यासाठी ते थेट कन्याकुमारीला पोहोचले. मोदींनी १५ मार्च रोजी कन्याकुमारीत प्रचार सुरू केला होता.
-----------------
राहुल गांधी - पाच मुद्द्यांवर ठाम
- राहुल गांधींच्या रॅली, सभा
यूपी १७, कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली प्रत्येकी ६, म. प्रदेश ५, केरळ १४, महाराष्ट्र १३, पंजाब ४, राजस्थान, ओडिशा, गुजरात प्रत्येकी ३, हरयाणा ४, हिमाचल २, झारखंड २, तामिळनाडू २, छत्तीसगड २
राहुल गांधींनी केलेली प्रमुख वक्तव्ये
- बेरोजगार तरुणांना प्रत्येक महिन्याला ८,५०० रुपये देणार
- आरक्षण मर्यादा ५० टक्क्यांवर नेणार
- महिलांना प्रत्येक वर्षी १ लाख रुपये
- महिलांचे आरक्षण तत्काळ लागू
- शेतकऱ्यांना एमएसपीची कायदेशीर हमी
- लोकशाही आणि संविधान वाचविणार
- आरक्षणावरून राहुल गांधींनी भाजपला घेरले
राहुल गांधी यांनी पाच न्याय गॅरंटीवर लक्ष केंद्रित केले होते. त्यांनी भाजपच्या ४०० पारचा नारा मुद्दा बनवत भाजप नेते आरक्षण संपविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. या मुद्द्यावरून भाजप मोठ्या प्रमाणात अडकली. यावरून मोदींना सतत उत्तर द्यावे लागले.
- राहुल गांधी बदलले
राहुल गांधी यांनी आपली भाषणशैली वेगळी ठेवली. त्यांनी प्रत्येक सभेत हातात संविधानाची प्रत घेऊन भाषण केले. मेट्र, टेम्पोतून लोकांशी संवाद साधला.