National Herald Case: नॅशनल हेराल्डमध्ये हवाला व्यवहार? EDला मिळाले पुरावे, सोनिया-राहुल यांच्या वक्तव्यांची फेरतपासणी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 06:03 PM2022-08-04T18:03:55+5:302022-08-04T18:06:24+5:30

National Herald Case: अंमलबजावणी संचालनालयाला नॅशनल हेराल्ड प्रकरणात हवाला लिंक सापडली आहे. त्यामुळे आता याप्रकरणात तपास यंत्रणा मोठी कारवाई करू शकते.

National Herald Case | Sonia Gandhi | Rahul Gandhi | National Herald Case ED found hawala links in National Herald case | National Herald Case: नॅशनल हेराल्डमध्ये हवाला व्यवहार? EDला मिळाले पुरावे, सोनिया-राहुल यांच्या वक्तव्यांची फेरतपासणी होणार

National Herald Case: नॅशनल हेराल्डमध्ये हवाला व्यवहार? EDला मिळाले पुरावे, सोनिया-राहुल यांच्या वक्तव्यांची फेरतपासणी होणार

Next

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणाचा तपास करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाला (ED) हवाला लिंक सापडली आहे. नॅशनल हेराल्ड आणि संबंधित संस्थांमध्ये हा हवाला व्यवहार झाल्याची माहिती आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंग इंडिया परिसराची झडती पूर्ण केल्यानंतर ईडी नॅशनल हेराल्ड प्रकरणात मोठी कारवाई करू शकते. याशिवाय सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या वक्तव्यांची फेरतपासणी केली जाणार आहे.

यापूर्वी काल म्हणजेच बुधवारी ईडी अधिकाऱ्यांनी यंग इंडिया लिमिटेडचे ​​नॅशनल हेराल्ड कार्यालय सील केले होते. ईडी आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या वक्तव्यांची फेरतपासणी करणार आहे. नॅशनल हेराल्ड, त्याच्या संलग्न कंपन्या आणि तिसऱ्या गटात हवाला व्यवहाराचे पुरावे सापडले असल्याचा दावा ईडीच्या सूत्रांनी केला आहे.

ईडीला हवाला लिंक कशी मिळाली?
दिल्लीतील हेराल्ड बिल्डिंगमधील यंग इंडियाच्या कार्यालयाच्या तपासणीदरम्यान ईडीला काही कागदपत्रे सापडली आहेत. मुंबई आणि कोलकाता येथील हवाला ऑपरेटर्सच्या व्यवहाराचे पुरावे कागदपत्रांमध्ये सापडले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंग इंडियाच्या कार्यालयाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर ईडी मोठी कारवाई करेल. ही कारवाई काय असेल, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

राहुल-सोनियाच्या वक्तव्याची फेरतपासणी का?
नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी यांची 3 दिवसांत 12 तास चौकशी करण्यात आली. ईडीने 21 जुलैला 3 तास, 26 जुलैला 6 तास आणि 27 ऑगस्टला 3 तास चौकशी केली. यावेळी त्यांना 100 हून अधिक प्रश्न विचारण्यात आले. ईडीने जूनमध्ये पाच दिवसांत राहुल गांधींची 50 तासांपेक्षा जास्त चौकशी केली होती. चौकशीदरम्यान सोनिया आणि राहुल गांधी यांनी यंग इंडियाकडून कोणताही लाभ घेतला नसल्याचे सांगितले होते. यंग इंडियाकडून मिळालेल्या कागदपत्रांनंतर, ईडी दोघांच्याही उत्तरांनी समाधानी नाही, त्यामुळे या जबाबांची पुन्हा तपासणी केली जाईल.

मंगळवारी 16 ठिकाणी छापे
ईडीच्या पथकाने मंगळवारी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यासह नॅशनल हेराल्डच्या 16 ठिकाणी छापे टाकले होते. सोनिया आणि राहुल यांची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. बुधवारी ईडीने दिल्लीतील हेराल्ड बिल्डिंगमधील यंग इंडिया कंपनीचे कार्यालय सील केले. यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आपला कर्नाटक दौरा सोडून दिल्लीला परतले.
 

Web Title: National Herald Case | Sonia Gandhi | Rahul Gandhi | National Herald Case ED found hawala links in National Herald case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.