'पोलिसांनी माझे कपडे फाडले', महिला खासदाराचा आरोप; शशी थरूर यांनी शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 12:48 PM2022-06-16T12:48:54+5:302022-06-16T12:50:30+5:30

National Herald Case: तामिळनाडूतील काँग्रेस खासदार जोथिमनी यांनी आरोप केला आहे की, दिल्ली पोलिसांनी त्यांचे कपडे फाडले आणि एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे बसमध्ये टाकून नेले.

National Herald Case:'Police tore my clothes', alleges female congress MP Jothimani; Video shared by MP Shashi Tharoor | 'पोलिसांनी माझे कपडे फाडले', महिला खासदाराचा आरोप; शशी थरूर यांनी शेअर केला व्हिडिओ

'पोलिसांनी माझे कपडे फाडले', महिला खासदाराचा आरोप; शशी थरूर यांनी शेअर केला व्हिडिओ

Next

नवी दिल्ली: नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या ईडीच्या चौकशीच्या विरोधात पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसोबत दिल्लीपोलिसांनी केलेल्या कथित गैरवर्तनावरून वाद सुरूच आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत काल पक्षनेत्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. काही नेत्यांनी व्हिडिओ प्रसिद्ध करून पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला. पक्षाचे खासदार शशी थरूर यांनी पक्षातील एका महिला खासदाराचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पोलिसांवर गैरवर्तनाचा आरोप करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना शशी थरूर यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

सभ्यतेचे उल्लंघन
शशी थरूर यांनी ट्विट केले की, "कोणत्याही लोकशाहीत हे अपमानास्पद आहे. महिला आंदोलकाला अशी वागणूक देणे हे प्रत्येक भारतीय शिष्टाचाराचे उल्लंघन आहे. लोकसभा खासदारासोबत असे करणे ही खालच्या पातळीची गोष्ट आहे. मी दिल्ली पोलिसांच्या वर्तनाचा निषेध करतो. सभापती कृपया कारवाई करावी," अशी मागणी थरूर यांनी केली.

व्हिडिओमध्ये काय..?
व्हिडिओद्वारे तामिळनाडूमधील करूर मतदारसंघाच्या काँग्रेस खासदार जोथिमनी यांनी आरोप केला की, दिल्ली पोलिस कर्मचारी त्यांचे कपडे फाडून त्यांना गुन्हेगाराप्रमाणे घेऊन गेले. यावेळी त्यांनी फाटलेला कुर्तादेखील दाखवला. व्हिडिओमध्ये त्या फक्त एकच बूट घातलेल्या दिसत आहेत, दुसरा बूट पोलिसांसोबतच्या झटापटीत गेल्याचे त्या सांगतात. यावळी त्यांनी दिल्ली पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप केला. त्यांनी माझे कपडे फाडले, माझे बूट काढले आणि मला इतर महिला आंदोलकांसह एका गुन्हेगाराप्रमाणे बसमध्ये नेले, असा आरोप त्यांनी केलाय.

पाणी देण्यास नकार दिला
पोलिसांनी पाणी देण्यासही नकार दिल्याचा आरोपही त्यांनी केला. त्या म्हणाले, "बसमध्ये माझ्यासह 7-8 महिला आहेत. आम्ही वारंवार पाणी मागत आहोत, मात्र पाणी दिले गेले दिला. आम्ही बाहेरून पाणी आणण्याचा प्रयत्न केला असता, ते पाणी विक्रेत्यांना न देण्यास सांगत आहेत." व्हिडिओमध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना संपूर्ण प्रकरणाकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 

Web Title: National Herald Case:'Police tore my clothes', alleges female congress MP Jothimani; Video shared by MP Shashi Tharoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.