No Confidence Motion: सभागृहाची दिशाभूल केल्याप्रकरणी राहुल गांधींविरोधात भाजपा आणणार विशेषाधिकार भंग प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 04:04 PM2018-07-20T16:04:22+5:302018-07-20T16:04:26+5:30
मोदी सरकारविरोधात लोकसभेत सुरू असलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी मंत्र्यांवर खोटे आरोप करून सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप करत भाजपाने राहुल गांधींविरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे.
Next
नवी दिल्ली - मोदी सरकारविरोधात लोकसभेत सुरू असलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी मंत्र्यांवर खोटे आरोप करून सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप करत भाजपाने राहुल गांधींविरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे.
BJP to move privilege motion against Rahul Gandhi in Lok Sabha over his 'false allegations' #NoConfidenceMotionpic.twitter.com/bGioU1PS00
— ANI (@ANI) July 20, 2018
राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तावावरील आपल्या भाषणादरम्यान, राफेल करारावरून केंद्र सरकार आणि संरक्षण मंत्रालयावर आरोप केले होते. मात्र हे आरोप संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी फेटाळून लावले. मात्र राहुल गांधींनी केलेल्या या आरोपांवरून संतप्त झालेल्या भाजपाने राहुल गांधींविरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपा नेते आणि संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी ही माहिती दिली.
BJP MPs will move a privilege motion against Rahul Gandhi for putting forth falsehood and misleading the Parliament: Ananth Kumar, BJP leader and Union Affairs minister pic.twitter.com/QSCFEdQEKM
— ANI (@ANI) July 20, 2018