संसदेत असं काय घडलं की ज्यामुळे राहुल गांधींनी दिला फ्लाईंग किस? ज्यामुळे पेटलाय वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 04:46 PM2023-08-09T16:46:39+5:302023-08-09T16:47:31+5:30

No Confidence Motion : भाषण आटोपून जात असताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी महिला खासदारांकडे पाहून फ्लाईंग किस दिल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला. पण हे नेमकं प्रकरण काय, आणि असं काय झालं की, ज्यामुळे राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाईंग किस दिला. त्याबाबतची माहिती घेऊया.

No Confidence motion: What happened in Parliament that made Rahul Gandhi give a flying kiss? Which sparked controversy | संसदेत असं काय घडलं की ज्यामुळे राहुल गांधींनी दिला फ्लाईंग किस? ज्यामुळे पेटलाय वाद

संसदेत असं काय घडलं की ज्यामुळे राहुल गांधींनी दिला फ्लाईंग किस? ज्यामुळे पेटलाय वाद

googlenewsNext

केंद्रातील मोदी सरकारवर आणण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेमध्ये आज दुसऱ्या दिवशी चर्चा सुरू आहे. आज काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी घणाघाती भाषण करत मणिपूरच्या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. मात्र हे भाषण आटोपून जात असताना राहुल गांधी यांनी महिला खासदारांकडे पाहून फ्लाईंग किस दिल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला. त्यानंतर भाजपाच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली. पण हे नेमकं प्रकरण काय, आणि असं काय झालं की, ज्यामुळे राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाईंग किस दिला. त्याबाबतची माहिती घेऊया.

अविश्वास प्रस्तावावरील चर्चेच्या दुसऱ्या दिवशी चर्चा होत होती. त्यावेळी बोलण्यासाठी राहुल गांधी हेही सभागृहात पोहोचले होते. भाषण संपताच राहुल गांधी सभागृहातून बाहेर जात होते. त्यावेळी त्यांच्या हातून काही कागद जमिनीवर पडले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे कागद उचलण्यासाठी राहुल गांधी खाली वाकले. तेव्हा सत्ताधारी भाजपाचे खासदार हसू लागले. त्यावेळी राहुल गांधी यांनी ट्रेजरी बेंचकडे पाहून फ्लाईंग किस दिला आणि हसत निघून गेले. 

मात्र ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली नाही. मात्र तिथे उपस्थित असलेल्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना त्यांच्या नजरेसमोर घडली. त्यावेळी स्मृती इराणी यांचं भाषण सुरू होतं. अशा परिस्थितीत जेव्हा ही बाब त्यांच्यापर्यंत पोहोचली, तेव्हा त्यांनी भर सभागृहात या गोष्टीचा उल्लेख केला.

स्मृती ईरानी म्हणाल्या की, येथे माझ्या आधी ज्यांना बोलायची संधी देण्यात आली त्यांनी आज असभ्यपणाचा परिचय दिला आहे. त्यांनी आपले भाषण संपल्यानंतर, असभ्य वर्तन केले. त्यांनी ज्या संसदेत फ्लाइंग किसचा इशारा केला, तिथे महिला सदस्यही आहेत. असे आचरण केवळ एक स्त्रीयांप्रति द्वेष असणारी व्यक्तीच करू शकते. एवढेच नाही, तर असे असभ्य आचरण या देशाच्या संसदेत कधीही दिसले नाही. हे त्या खानदानाचे लक्षण आहे, हे आज देशाला समजले, असेही स्मृती म्हणाल्या.

तर केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी या वादावर बोलताना राहुल गांधींचं वर्तन अयोग्य असल्याचे सांगितले, तसेच लोकसभा अध्यक्षांकडे आपली तक्रार नोंदवली. यादरम्यान त्यांच्यासोबत अनेक महिला सदस्यही उपस्थित होत्या. त्या सर्वांनी या तक्रार पत्रावर सह्या करत कठोर कारवाईची मागणी केली.  

Web Title: No Confidence motion: What happened in Parliament that made Rahul Gandhi give a flying kiss? Which sparked controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.