निवडणूक नाही, खरगे निवडणार आपली टीम; सुकाणू समिती बैठकीपासून गांधी कुटुंबीय दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 06:32 AM2023-02-25T06:32:50+5:302023-02-25T06:35:17+5:30
काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी बैठकीपासून दूर राहिले
आदेश रावल
रायपूर - काँग्रेस कार्यकारिणीची निवडणूक होणार नाही. रायपूरमध्ये सुरू झालेल्या काँग्रेसच्या तीनदिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हा निर्णय सुकाणू समितीच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेच आपली टीम निवडतील.
बैठकीत दिग्विजय सिंह, अजय माकन व अभिषेक मनू सिंघवी यांनी कार्यकारिणी निवडणुकीचा मुद्दा मांडला हाेता. निवडणुका झाल्या पाहिजेत, असे राहुल गांधी व त्यांच्या समकक्ष नेत्यांचे म्हणणे होते. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी बैठकीपासून दूर राहिले. काँग्रेसमध्ये ५० टक्के पदे ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या नेत्यांना देणे, एससी, एसटी व ओबीसी नेत्यांना संघटनेत बरोबरीची संधी देणे व पक्षाच्या माजी अध्यक्षांना तसेच माजी पंतप्रधानांना आजीवन कार्यकारिणी सदस्यत्व बहाल करण्यासह अनेक प्रस्तावांवर चर्चा झाली.