"मोदींना घाबरत नाही म्हणून मला 30 सेकंदात झोप लागते मात्र..."; राहुल गांधींची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 10:35 AM2021-02-28T10:35:24+5:302021-02-28T10:40:29+5:30

Congress Rahul Gandhi And PM Narendra Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

not afraid of narendra modi sleep peacefully at night says congress rahul gandhi in tamilnadu | "मोदींना घाबरत नाही म्हणून मला 30 सेकंदात झोप लागते मात्र..."; राहुल गांधींची बोचरी टीका

"मोदींना घाबरत नाही म्हणून मला 30 सेकंदात झोप लागते मात्र..."; राहुल गांधींची बोचरी टीका

googlenewsNext

चेन्नई - तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या (Tamilnadu Election 2021) तारखेची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सध्या राहुल गांधी तामिळनाडूमध्ये असून त्यांनी तेथील मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. "मला रात्री फक्त 30 सेकंदांमध्ये झोप लागते. कारण मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही. मोदींना वाटतं की ते तामिळनाडूच्या लोकांना कंट्रोल करू शकतात. मात्र आता हेच नागरिक या रिमोटमधील बॅटरी काढून ती फेकून देणार आहेत" असं म्हणत राहुल यांनी हल्लाबोल केला आहे. 

"मला रात्री फक्त 30 सेकंदांमध्ये झोप लागते. कारण मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना घाबरत नाही. मात्र तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना झोप लागायला किती वेळ लागत असेल? त्यांना रात्री झोपच लागत नसेल, कारण ते प्रामाणिक नाहीत. ते प्रामाणिक नसल्यामुळेच मोदींच्या विरोधात उभे राहू शकत नाहीत. तसेच जे असा विचार करतात की आपण तामिळनाडूच्या लोकांना हवं तसं हाताळू शकतो कारण तिथला मुख्यमंत्री भ्रष्टाचारी आहे" असं म्हणत राहुल गांधींनी मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

राहुल गांधी यांनी "मोदींना वाटतं की तामिळनाडू त्यांच्यासाठी एका टीव्हीच्या रिमोटप्रमाणे आहे. ते हा रिमोट हातात घेऊन जे हवं ते करू शकतात. त्यांनी आवाज वाढवताच तिथले मुख्यमंत्रीही जोरजोराने बोलू लागतात. त्यामुळे मोदींना वाटतं की ते तामिळनाडूच्या लोकांना कंट्रोल करू शकतात. मात्र, आता हेच नागरिक या रिमोटमधील बॅटरी काढून ती फेकून देणार आहेत" असं म्हणत राहुल यांनी मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे.  विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तामिळनाडूमध्ये गेलेले राहुल गांधी यांनी भाजपा आणि केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. मी भ्रष्ट नाही. त्यामुळेच भाजपा दिवसाचे 24 तास माझ्यावर टीका करत असतात, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. 

"मी भ्रष्ट नाही, त्यामुळेच भाजपावाले माझ्यावर दिवसभर टीका करतात"

थुथुकुडी येथे सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, आमचे पंतप्रधान देशाच्या हितांशी तडजोड करतील हे चीनला माहिती होते. गेल्या सहा वर्षांमध्ये भाजपा आणि संघाने देशातील विविध संस्था आणि फ्री प्रेसवर पद्धतशीरपणे हल्ला केला. तसेच मी भ्रष्ट नाही. त्यामुळेच भाजपा दिवसाचे 24 तास माझ्यावर टीका करत असतात, असा दावाही राहुल यांनी केला. देशातील लोकशाही ही एका फटक्यात नष्ट होणार नाही. तर ती हळूहळू संपुष्टात येते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विविध संस्थामधील संपुष्टात आणले आहे. यावेळी राहुल गांधी यांनी महिलांच्या आरक्षणाबाबतही भूमिका मांडली. न्यायपालिका आणि संसदेमध्ये महिलांना आरक्षण मिळावे असे माझे मत आहे, असेही राहुल गांधी यांनी सांगितले. 

"लोकसभा आणि राज्यसभेतही चर्चा करू देत नाहीत, न्यायव्यवस्थेवरही मोदी सरकारचे नियंत्रण"

 न्यायव्यवस्थेच्या मुद्द्यावरून राहुल यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. "केंद्र सरकार स्वतःच्या इच्छा आणि ताकद न्यायपालिकेवर लादत असून न्यायालयांनी जे करणं आवश्यक आहे, ते सरकारकडून करू दिलं जात नाही. न्यायव्यवस्थेवर मोदी सरकारचे नियंत्रण आहे" अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली आहे. "दिल्लीतील सरकार (मोदी सरकार) स्वतःच्या इच्छा आणि ताकद न्यायव्यवस्थेवर लादत आहे. केंद्र सरकार काही गोष्टी होऊ देत नाहीत किंवा जे करणं आवश्यक आहे, ते न्यायपालिकेला करू देत नाही. हे फक्त न्यायालयांच्या बाबतीतच नाही, तर ते लोकसभा आणि राज्यसभेतही चर्चा करू देत नाही. निवडणूक जिंकणं म्हणजे हरणं आणि हरणं म्हणजे जिंकणं असं पहिल्यादांच घडत आहे" अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

Web Title: not afraid of narendra modi sleep peacefully at night says congress rahul gandhi in tamilnadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.