वरुण गांधी धरणार का काँग्रेसचा 'हात'? राहुल गांधी म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 03:50 PM2019-01-25T15:50:21+5:302019-01-25T15:52:16+5:30

वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा

Not aware about speculations about Varun joining Congress says Rahul Gandhi | वरुण गांधी धरणार का काँग्रेसचा 'हात'? राहुल गांधी म्हणतात...

वरुण गांधी धरणार का काँग्रेसचा 'हात'? राहुल गांधी म्हणतात...

Next

ओदिशा: देशाच्या राजकारणातलं सर्वात मोठं कुटुंब असलेल्या गांधी घराण्यातील प्रियंका गांधींनी दोन दिवसांपूर्वी अधिकृतपणे राजकारणात प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी-वाड्रा यांच्याकडे पक्षानं उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी सोपवली. याशिवाय पक्षाच्या महासचिवपदीदेखील त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रियंका यांच्या राजकारणातील प्रवेशानंतर आता त्यांचे चुलत भाऊ वरुण गांधी भाजपा सोडून काँग्रेसचा हात धरणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. ओडिशा दौऱ्यात राहुल यांनी याबद्दलचा प्रश्नदेखील विचारण्यात आला. 

भाजपामध्ये नाराज असलेले वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची सध्या राजकीय वर्तुळात आहे. त्याबद्दल ओदिशा दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला. त्यावर मी अशा चर्चा ऐकलेल्या नाहीत, असं उत्तर राहुल यांनी दिलं. राहुल यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबजारी स्वीकारल्यानंतरही वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोरात होत्या. यानंतर आता प्रियंका गांधी राजकारणात सक्रीय झाल्यानंतर पुन्हा हीच चर्चा सुरू झाली आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून वरुण गांधी पक्षाच्या नेतृत्त्वावर प्रचंड नाराज आहेत. त्यांनी सरकारच्या अनेक निर्णयांवर टीकादेखील केली आहे. याशिवाय रोहिंग्या मुस्लिमांच्या मुद्द्यावरुनही त्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली होती. 1980 मध्ये वरुण गांधी यांचे वडील संजय गांधी यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर वरुण गांधी यांच्या आई मेनका गांधी यांनी काँग्रेसपासून दूर राहण्यास सुरुवात केली. 1988 मध्ये त्या जनता दलात गेल्या. त्यानंतर 2004 मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. वरुण गांधीदेखील 2004 मध्ये भाजपामध्ये आले. 2009 मध्ये ते पिलीभीत लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. तर 2014 मध्ये ते उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमधून लोकसभेत गेले. वरुण गांधी त्यांच्या आक्रमक भाषणांसाठी ओळखले जातात. 
 

Web Title: Not aware about speculations about Varun joining Congress says Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.