आता SC/ST, ओबीसींना काँग्रेसमध्ये मिळणार 50% आरक्षण, चिंतन शिबिरात घेण्यात आला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 07:52 PM2022-05-14T19:52:00+5:302022-05-14T20:19:58+5:30

सामाजिक न्याय आणि सशक्तिकरणासंदर्भात तयार करण्यात आलेल्या कमिटीने आरक्षणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. रविवारी काँग्रेस वर्किंग कमिटीसमोर हा प्रस्ताव सादर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Now Congress plans 50 percent reservation for the weaker sections in Congress party, a big decision was taken in Chintan Shivir | आता SC/ST, ओबीसींना काँग्रेसमध्ये मिळणार 50% आरक्षण, चिंतन शिबिरात घेण्यात आला मोठा निर्णय

आता SC/ST, ओबीसींना काँग्रेसमध्ये मिळणार 50% आरक्षण, चिंतन शिबिरात घेण्यात आला मोठा निर्णय

googlenewsNext

आता काँग्रेसमध्ये एससी/एसटी आणि ओबीसी समाजासाठी 50 टक्के आरक्षण असेल, असा निर्णय राजस्थानातील उदयपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या तिन दिवसीय चिंतन शिबिरात घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पक्षातील एक मोठा वर्ग गेल्या अनेक दिवसांपासून पक्ष संघटनेत एससी/एसटी आणि ओबीसी समाजासाठी 50 टक्के आरक्षणाची मागणी करत होता. 

चिंतन शिबिराच्या दुसऱ्या दिवशी पक्षाचे नेते के राजू यांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणासाठी पक्षात संघटनात्मक बदलांना मान्यता देण्यात आली आहे. एवढेच नाही, तर सामाजिक न्याय आणि सशक्तिकरणासंदर्भात तयार करण्यात आलेल्या कमिटीने आरक्षणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. रविवारी काँग्रेस वर्किंग कमिटीसमोर हा प्रस्ताव सादर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

याशिवाय, पक्षात सामाजिक न्याय सल्लागार परिषदेचीही स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही समिती काँग्रेस अध्यक्षांसमोर सामाजिक मुद्दे ठेवेल आणि त्यांना सल्ला देईल, असे सांगण्यात येत आहे. याशिवाय सामाजिक स्थरावर दुर्बल घटकांसाठी 6 महिन्यात एक वेळा काँग्रेस वर्किंग कमेटीची बैठक होईल.

उदयपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या तीन दिवसीय चिंतन शिबिराचा रविवारी तिसरा दिवस आहे. येथे दोन दिवस वेगवेगळ्या समित्यांमध्ये जे निर्णय घेतले जातील ते रविवारी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीसमोर ठेवले जातील. यानंतर या निर्णयांवर काँग्रेस वर्किंग कमिटी अंतिम निर्णय घेईल.


 

Web Title: Now Congress plans 50 percent reservation for the weaker sections in Congress party, a big decision was taken in Chintan Shivir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.