Jammu And Kashmir : काँग्रेस नेते राहुल गांधी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 10:46 AM2019-08-24T10:46:00+5:302019-08-24T10:57:23+5:30

कलम 370 हटविल्यानंतर पहिल्यांदाच राहुल गांधी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

Opposition Leaders, Including Rahul Gandhi, to Visit Srinagar Today as J&K Lockdown Continues | Jammu And Kashmir : काँग्रेस नेते राहुल गांधी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर 

Jammu And Kashmir : काँग्रेस नेते राहुल गांधी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर 

Next
ठळक मुद्देकाँग्रेस नेते राहुल गांधी हे शनिवारी (24 ऑगस्ट) जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहे. राहुल यांच्यासोबत विरोधी पक्षातील 9 नेतेही सोबत असणार आहेत. कलम 370 हटविल्यानंतर पहिल्यांदाच राहुल गांधी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी हे शनिवारी (24 ऑगस्ट) जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहे. राहुल यांच्यासोबत विरोधी पक्षातील 9 नेतेही सोबत असणार आहेत. कलम 370 हटविल्यानंतर पहिल्यांदाच राहुल गांधी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. जम्मू काश्मीरमध्ये गेल्यानंतर तेथील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्याचसोबत स्थानिक नेत्यांसोबतच सामान्य नागरिकांची राहुल गांधी भेट घेणार आहेत तसेच जनतेशी संवाद साधणार आहेत. यापूर्वी जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना काश्मीरमध्ये येण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. 

कलम 370 हटविल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जवानांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. मात्र या मुद्द्यावरुन काँग्रेसने भाजपावर टीकेचं लक्ष्य केलेलं असताना जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना टोला लगावला होता. विमान पाठवतो, स्वत: येऊन काश्मीरची परिस्थिती पाहा असं आवाहन केलं होतं त्यावर राहुल गांधी यांनीही सत्यपाल मलिक यांना विरोधी पक्षाचे नेते आणि मी जम्मू काश्मीर, लडाखला भेट देतो. तुमच्या निमंत्रणासाठी मी कृतज्ञ आहे असं त्यांनी म्हटलं होतं. 

तसेच आम्हाला विमानाची गरज भासणार नाही परंतु कृपया आम्हाला प्रवास करण्याचे आणि तेथील लोक, मुख्य प्रवाहातील नेते आणि आमच्या सैनिकांना भेटण्याचे स्वातंत्र्य मिळेल याची खात्री करा असं प्रत्युत्तर राहुल गांधी यांनी सत्यपाल मलिक यांना दिलं होतं. यानंतर दोन दिवसांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी ट्विट करत मी विना अट काश्मीरातील लोकांना भेटण्यासाठी तयार आहे. मी कधी आणि केव्हा यायचं? असं त्यांनी म्हटलं होतं. 

Authorities in Srinagar increase restrictions ahead of Friday prayers after separatist call for protests | फुटीरतावाद्यांची मोर्चाची हाक; श्रीनगरमध्ये पुन्हा निर्बंध लागू

काश्मीरमधील बहुतांश भागात या आठवड्यात संचारबंदीसह लागू केलेले काही निर्बंध मागे घेण्यात आले होते. जागोजागी लावलेले बॅरिकेटस् काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे रसत्यावर लोकांची वर्दळ व वाहनांची ये-जा सुरू झाली होती. मात्र, राज्यातील सर्व बाजारपेठा अद्यापही बंद आहेत. 370 कलम रद्द केल्यापासून अठराव्या दिवशीही गुरुवारी इंटरनेट व मोबाईल सेवाही बंद ठेवण्यात आली होती. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याच्या निषेधार्थ लोकांनी मोर्चा काढावा, असे आवाहन करणारी फुटीरतवाद्यांच्या संयुक्त विरोधी समितीची भित्तीपत्रके झळकल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून श्रीनगरमध्ये पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले. लोकांनी लाल चौक व सोनवार येथे मोठ्या प्रमाणावर जमा होऊ नये म्हणून रस्त्यांत बॅरिकेटस् व तारांच्या जाळ्यांचे अडथळे उभारण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मोक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत.

Web Title: Opposition Leaders, Including Rahul Gandhi, to Visit Srinagar Today as J&K Lockdown Continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.