पोलिसांच्या धक्काबुक्कीमुळे पी. चिदंबरम यांना फ्रॅक्चर, काँग्रेस नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 10:33 PM2022-06-13T22:33:45+5:302022-06-13T23:02:57+5:30

सरकारने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांना राजकीय द्वेषातून ईडीची नोटीस पाठवल्याचं म्हणत काँग्रेसकडून याच्या विरोधात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली.

P. due to police pushback. Chidambaram fractured, Congress leader claims | पोलिसांच्या धक्काबुक्कीमुळे पी. चिदंबरम यांना फ्रॅक्चर, काँग्रेस नेत्याचा दावा

पोलिसांच्या धक्काबुक्कीमुळे पी. चिदंबरम यांना फ्रॅक्चर, काँग्रेस नेत्याचा दावा

Next

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी आज काँग्रेस नेते राहुल गांधी सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात हजर झाले. त्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान, याविरोधात काँग्रेसकडून देशभरात निदर्शने करण्यात आली. या आंदोलनादरम्यान माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली, यात त्यांचा चष्माही जमिनीवर पडला, तसंच डावीकडील बरगड्यांना हेअरलाईन फ्रॅक्चर झाल्याचा दावा काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला. त्यांनी एक व्हिडीओ जारी केला. “संपूर्ण दिवसभर काँग्रेसच्या नेत्यांवर हल्ला करण्यात आला. काँग्रेसचे संघटन महासचिव केसी वेणुगोपाल यांच्यावर हल्ला करण्यात आला. खासदार शक्ती सिंग गोहील यांच्यावर हल्ला करण्यात आला. काँग्रेस कार्यकर्त्यांनाही मारहाण करण्यात आली,” असं ते म्हणाले.

“खासदार प्रमोद तिवारी यांना रस्त्यावर ढकलण्यात आलं. त्यांच्या डोक्याला इजा झाली आणि त्यांच्या बरड्यांमध्येही फ्रॅक्टर आहे. ही लोकशाही आहे का?, विरोध करणं गुन्हा आहे का?,” असा सवालही सुरजेवाला यांनी केला. दरम्यान, विरोधकांच्या दाव्यावर पोलिसांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.



काय म्हणाले चिदंबरम?
“जेव्हा तीन मोठे आणि धडधाकट पोलिसवाले जेव्हा तुमच्यावर आदळतात, तेव्हा तुम्ही हेअरलाईन क्रॅकवर वाचता तेव्हा तुम्ही भाग्यवान असता. जर हेअरलाईनमध्ये थोडी गॅप असेल तर बरं होण्यासाठी १० दिवस लागतील असं डॉक्टरांनी सांगितलं. मी ठीक आहे आणि मी पुन्हा कामावर असेन,” असं चिदंबरम यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं.

Web Title: P. due to police pushback. Chidambaram fractured, Congress leader claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.