नरेंद्र मोदींना 73 वेळा तर राहुल गांधींना फक्त 6 वेळा दाखवलं; काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 08:07 PM2024-06-27T20:07:08+5:302024-06-27T20:07:46+5:30

संसद टीव्हीवर दोन्ही नेत्यांना दाखवण्यावरुन काँग्रेसने टीका केली आहे.

Parliament Session 2024: Narendra Modi was shown 73 times and Rahul Gandhi only 6 times; Congress attack government | नरेंद्र मोदींना 73 वेळा तर राहुल गांधींना फक्त 6 वेळा दाखवलं; काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

नरेंद्र मोदींना 73 वेळा तर राहुल गांधींना फक्त 6 वेळा दाखवलं; काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

Parliament Session 2024 : आज(27 जून) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित केले. यावेळी त्यांनी सरकारच्या कामांची माहिती देण्यासोबतच 1975 मध्ये काँग्रेसने देशात लागू केलेल्या आणीबाणीचाही उल्लेख केला. दरम्यान, आता राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी संसद टीव्हीवर पंतप्रधान मोदींना वारंवार दाखवले गेल्याने काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सरकारवर आरोप केला की, राष्ट्रपती मुर्मू यांच्या संसदेतील अभिभाषणावेळी पंतप्रधान मोदींना 73 वेळा आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना फक्त 6 वेळा दाखवण्यात आले.

त्यांनी X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, "राष्ट्रपतींच्या 51 मिनिटांच्या अभिभाषणात कोणाला किती वेळा दाखवले गेले? सभागृह नेते नरेंद्र मोदी यांना 73 वेळा, तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना 6 वेळा दाखवण्यात आले. सरकारमधील नेत्यांना 108 वेळा, तर विरोधी नेत्यांना 18 वेळा दाखवले गेले. संसद टीव्ही सभागृहाचे कामकाज दाखवण्यासाठी आहे, कॅमेराजीवींसाठी नाही," अशी बोचरी टीका त्यांनी केली.

मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल 
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्सवर लिहिले की, "मोदी सरकारने लिहिलेले राष्ट्रपतींचे अभिभाषण ऐकून असे वाटले की, पीएम मोदी निकाल मान्य करायला तयार नाहीत. देशातील जनतेने त्यांच्या 400 पारच्या नाऱ्याला नाकारले आणि भाजपला 272 च्या आकड्यापासून दूर ठेवले," अशी टीका त्यांनी केली.
 

Web Title: Parliament Session 2024: Narendra Modi was shown 73 times and Rahul Gandhi only 6 times; Congress attack government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.