"मतदारांनी काँग्रेसलाही जनादेश दिला, तो विरोधी बाकावर बसण्याचा", PM मोदींची बोचरी टीका...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 05:44 PM2024-07-02T17:44:25+5:302024-07-02T17:45:10+5:30
"मित्रपक्षांच्या मदतीने 99 जागा मिळवल्या. आता काँग्रेस पक्ष 2024 पासून परजीवी काँग्रेस म्हणून ओळखला जाईल."
Parliament Session 2024 : संसदेच्या विशेष अधिवेशनात आज(दि.2) पंतप्रधान मोदी (Narendra Modi) विरोधकांवर तुटून पडले. काल(दि.1) विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर केलेल्या टीका आणि आरोपांचे पीएम मोदींनी तितक्याच ताकतीने उत्तर दिले. "या देशाने दीर्घकाळ तुष्टीकरणाचे राजकारण पाहिले आणि प्रशासनाचे तुष्टीकरण मॉडेलही पाहिले आहे. जनतेने आमच्या 10 वर्षांच्या सरकारचा ट्रॅक रेकॉर्डही पाहिला आहे. लोकसेवा हीच ईश्वर सेवा, हा मंत्र बनवून आम्ही काम केले. देशातील जनता भ्रष्टाचाराने त्रस्त होती. आम्ही भ्रष्टाचाराबाबत झिरो टॉलरन्स धोरण राबवलेत. आज जगात भारताचा गौरव होतोय. जगात देशाची विश्वासार्हता वाढली आहे. भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलला आहे. गेल्या 10 वर्षात आमचे सरकार सबका साथ, सबका विकास या मंत्राचे पालन करून सर्वांचे कल्याण करण्याचा प्रयत्न करत आहे," असा दावा त्यांनी यावेळी केला.
#WATCH | PM Narendra Modi says, "I remember an incident, there was a boy who scored 99 marks and he used to show it to everyone. When people heard 99, they used to encourage him a lot. Then a teacher came and said why are you distributing sweets? He did not score 99 out of 100… pic.twitter.com/bfYYMKB1id
— ANI (@ANI) July 2, 2024
तिसऱ्या टर्ममध्ये तिप्पट वेगाने काम करू
पीएम मोदी पुढे म्हणाले, "तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचा संकल्प आम्ही घेतलाय. आमच्या तिसऱ्या टर्ममध्ये आम्ही तिप्पट वेगाने काम करू, तिप्पट ऊर्जा वापरू आणि तिप्पट परिणाम देशवासियांना देऊ. लोकसभा निवडणुकीसोबतच चार राज्यांमध्येही निवडणुका झाल्या, या चार राज्यांमध्येही आम्ही अभूतपूर्व निकाल मिळवला आहे. महाप्रभू जगन्नाथजींची भूमी असलेल्या ओडिशाने आम्हाला आशीर्वाद दिला, आंध्र प्रदेशात तर विरोधक सूक्ष्मदर्शकातूनही दिसत नाहीत. अरुणाचलमध्येही पुन्हा आमचे सरकार स्थापन झाले आहे. सिक्कीममध्येही एनडीएचे सरकार आले. राजस्थानमध्येही आम्ही जिंकलो. केरळमध्येही आमचे पहिल्यांदा खाते उघडले. तामिळनाडूमध्येही आमची मतांची टक्केवारी वाढली."
#WATCH | PM Modi says, "The Congress party is openly creating new narratives and spreading new plans every day to put one caste against another...It was clearly announced from various platforms that if the result they want is not achieved, the country will be set on fire on 4th… pic.twitter.com/dCItIaGY1X
— ANI (@ANI) July 2, 2024
जनतेचा काँग्रेसला जनादेश, पण...
"जनतेचे पूर्ण आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. देशातील जनतेने काँग्रेसलाही जनादेश दिला आहे. हा जनादेश विरोधी बाकांवर बसण्याचा आहे. काँग्रेसच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा काँग्रेसला सलग तीनवेळा शंभरचा टप्पा पार करता आलेला नाही. काँग्रेसच्या इतिहासातील हा तिसरा सर्वात मोठा पराभव आहे. तिसरी सर्वात वाईट कामगिरी. काँग्रेसने आपला पराभव मान्य केला असता, जनतेने जनार्दनचा आदेश मान्य करून आत्मपरीक्षण केले असते, तर बरे झाले असते. पण ते जनतेने भाजपचा पराभव केला, हे नागरिकांच्या मनात रुजवण्याचा दिवसरात्र प्रयत्न करत आहेत," अशी टीकाही मोदींनी केली.
#WATCH | Prime Minister Narendra Modi says, "An attempt has been made to spread anarchy by questioning the democratic process of India. The politics that was spread regarding CAA, the game of misleading the people of the country, all efforts were made to emphasise that their… pic.twitter.com/jiVMsT0jG4
— ANI (@ANI) July 2, 2024
सध्याची काँग्रेस परजीवी काँग्रेस आहे
पीएम मोदी पुढे म्हणाले की, "1984 नंतर देशात 10 निवडणुका झाल्या आणि 10 निवडणुकांमध्ये काँग्रेसला 250 चा आकडा गाठता आलेला नाही. यावेळी ते कसेबसे 99 वर आले आहेत. मला एक प्रसंग आठवतो...एक व्यक्ती 99 मार्क्स घेऊन फिरत होती. लोकांनी त्याचे कौतुकही केले. शिक्षक आले आणि विचारले तुम्ही कशासाठी अभिनंदन करता? त्याला शंभरपैकी 99 गुण मिळाले नाहीत, तर 543 पैकी 99 गुण मिळाले आहेत. 13 राज्यांमध्ये त्यांच्या शून्य जागा आहेत. काँग्रेसला जेवढ्या जागा मिळाल्या, त्यातील बहुतांश मित्रपक्षांमुळे मिळाल्या आहेत. आता काँग्रेस पक्ष 2024 पासून परजीवी काँग्रेस म्हणून ओळखला जाईल. परजीवी ज्या शरीरात जगतो, नंतर त्यालाच खातो. त्याचप्रमाणे काँग्रेसने मित्रपक्षांच्या मतांवर इथपर्यंत आली आहे," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
#WATCH | PM Narendra Modi says, "...A new drama has been started to gain sympathy but the country knows the truth that he (Rahul Gandhi) is out on bail in a case of embezzlement of thousands of crores of rupees. He has been convicted in a case of calling OBC people thieves. He… pic.twitter.com/7ZcGqoiTyD
— ANI (@ANI) July 2, 2024
मोदींनी मांडली आकडेवारी
"जिथे जिथे भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होती, जिथे काँग्रेसचा स्ट्राइक रेट केवळ 26 टक्के आहे. पण ज्या राज्यांमध्ये त्यांनी कोणाची तरी मदत घेतली आहे, तिथे त्यांचा स्ट्राइक रेट 50 टक्के आहे. काँग्रेसने एकट्याने लढलेल्या 16 राज्यांमध्ये त्यांच्या मतांची टक्केवारी घसरली आहे. गुजरात, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश ही तीन राज्ये आहेत, जिथे काँग्रेस स्वबळावर लढली आणि 64 पैकी फक्त दोन जागा जिंकल्या. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, या निवडणुकीत काँग्रेस पूर्णपणे परजीवी बनली आहे आणि मित्रपक्षांच्या खांद्यावर स्वार होऊन आपल्या जागांची संख्या वाढवली आहे. काँग्रेसने मित्रपक्षांची मते खाल्ली नसती तर लोकसभेच्या इतक्या जागा जिंकणे त्यांना फार कठीण गेले असते," असा दावाही त्यांनी यावेळी केला.
संबंधित बातमी- "2014 पूर्वी देशात घोटाळ्याचा काळ होता...", लोकसभेतून PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
संबंधित बातमी- “तिसऱ्या टर्ममध्ये तिप्पट वेगाने काम, विकसित भारताचा संकल्प पूर्ण होणार”; PM मोदींची लोकसभेत गॅरंटी