पंतप्रधान मोदी शपथ घ्यायला जाताच राहुल गांधींनी हात वर केला अन्...; व्हायरल होतोय VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 01:20 PM2024-06-24T13:20:03+5:302024-06-24T13:30:45+5:30
Rahul Gandhi : लोकसभेच्या अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा शपथ घेतली.
Parliament Session 2024: १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याद दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना सल्ला देताना काँग्रेसवर निशाणा साधला. दुसरीकडे इंडिया आघाडीच्या नेत्यांनी संविधानाची प्रत हातात घेत संसदेबाहेर घोषणाबाजी केली. त्यानंतर सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारकीची शपथ घेतली. मात्र यादरम्यानची काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि विरोधकाची एक कृती व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पंतप्रधान मोदी शपथ घेण्यासाठी जात असतानाच विरोधी पक्षात बसलेल्या राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी हात वर केला. राहुल गांधी यांच्यासह अन्य विरोधकांनाही यावेळी हात वर केले होते. राहुल गांधींच्या या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यानंतर पंतप्रधान मोदींनी सभागृहात बसलेल्या सर्व खासदारांना हात जोडून अभिवादन केले. यावेळी राहुल गांधी हे संविधानाची प्रत घेऊन सभागृहात बसले होते. त्यांनी हसत आणि हात जोडून पंतप्रधान मोदींच्या अभिवादनाला उत्तर दिले. याशिवाय सभागृहात उपस्थित असलेल्या इतर खासदारांनीही पंतप्रधान मोदींचे हात जोडून अभिवादन स्वीकारले. पंतप्रधान मोदी खासदारकीची शपथ घेण्यासाठी जात असतानाच राहुल गांधी यांनी संविधानाची प्रत हातात उचलली आणि हात वर केला. राहुल गांधींसह त्यांच्यासोबत बसलेल्या इतर खासदारांनी संविधानाची प्रत घेऊन हात वर केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींना संविधानाची प्रत दाखवण्याच्या उद्देषाने राहुल गांधी यांनी हे कृत केल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
मोदी जी, शपथ लेते वक्त ध्यान से देख लीजिए बाबा साहेब के इस संविधान को,
— Alka Lamba 🇮🇳 (@LambaAlka) June 24, 2024
ये देश संविधान से ही चलेगा। pic.twitter.com/ftU6aRuSs4
दुसरीकडे, लोकसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर निशाणा साधला. तर काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींवर पलटवार करण्यात आला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि जयराम रमेश यांनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा संविधानावर जो हल्ला करत आहेत, तो आम्हाला मान्य नाही, असे राहुल गांधी म्हणाले. तर संविधान वाचवण्यासाठी आम्ही जे प्रयत्न केले त्यात जनता आमच्या पाठीशी आहे. पण मोदींनी संविधान मोडण्याचा प्रयत्न केला, असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.
यासोबत अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी इंडिया आघाडीच्या खासदारांनी संविधानाची प्रत घेऊन संसदेबाहेर मोर्चा काढला. यावेळी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हेही उपस्थित होते. यानंतर सर्व विरोधी खासदार संविधानाची प्रत घेऊन सभागृहात पोहोचले.